थ्रिसूर : आर्थिक देवाणघेवाणीवरुन मतभेद झाल्याने तरुणाने आपल्या २६ वर्षीय मैत्रिणीची हत्या केली. हत्येनंतर तरुणाने मैत्रिणीच्या मृतदेहाचे तुकडे केले. केरळातील थ्रिसूर जिल्ह्यातील चालकुडी येथे असलेल्या थुंबूरमुझी जंगलात तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे पुरलेले आढळले. कुणीही कल्पनाही करणार नाही अशा जागेची निवड अखिलने तिच्या बॉडीचे अवशेष गाडण्यासाठी केली होती.अथिरा नामक २६ वर्षीय तरुणीने आरोपी अखिल याला काही रक्कम आणि सोन्याचे दागिने उधार दिले होती. मात्र अचानक पैशांची गरज निर्माण झाल्याने अथिराने उसने दिलेले पैसे अखिलकडे परत मागितले. यावरुन वाद झाल्यानंतर अखिलने अथिराची हत्या केल्याचा आरोप आहे.
आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार अथिराचा पती सनिल याने कलाडी पोलिसात केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. २९ एप्रिलपासून अथिराशी सनीलचा कुठलाच संपर्क होत नव्हता.
आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार अथिराचा पती सनिल याने कलाडी पोलिसात केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. २९ एप्रिलपासून अथिराशी सनीलचा कुठलाच संपर्क होत नव्हता.
अथिराच्या फोनचे शेवटचे लोकेशन चालकुडी येथे असलेल्या थुंबूरमुझी जंगलात दाखवत होते. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी तपास सुरु केला असता हत्येचा उलगडा झाला.
अथिराला अखिलसोबत एका सुपरमार्केटजवळ कारमध्ये बसताना शेवटचे पाहिल्याचे समोर आले. पोलिसांनी अखिलला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या कृत्याची घडाघडा कबुली दिली. अथिराकडून उधारीवर घेतलेले सोने आणि पैसे परत करावे लागू नयेत, या कारणावरुन आपण तिचा खून केल्याचा दावा अखिलने केला.
अनैतिक संबंध असल्याचा संशय, रागात त्यानं प्रेयसी आणि मुलांना संपवलं
अथिराच्या खांद्यावरील शालीनेच तिचा गळा आवळला. त्यानंतर तिची हत्या करुन मृतदेह जंगलात पुरल्याचं अखिलने सांगितलं. अखिलने पोलिसांच्या तपास पथकाला घटनास्थळी नेले असता तिथे तिच्या मृतदेहाचे तुकडे गाडलेल्या अवस्थेत आढळले.