Maharashtra Rain Updates Light To Moderate Spells Of Rain In Pune Nasik During Next 3 To 4 Hours; महाराष्ट्रावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई : राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा आधी चिंतेत आहे. अशात आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ३-४ तास राज्यासाठी महत्त्वाचे आहे. या वेळत अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ३-४ तासांत बीड, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि धान्यचा योग्य ठिकाणी साठा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नवऱ्याकडून रोज व्हायचा अमानुष छळ; सफाई करताना पत्नीला सापडला असा कागद ज्याने गेमच पलटला राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांना पुढचे दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला असून परभणी, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातही विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.