मुंबईः मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्रावर पावसाचे ढग दाटून आले आहेत. पुढील २४ ते ४८ तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. मुंबईसह कोकणातही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागनं सांगितलं आहे.

१५ ऑगस्टपर्यंत हा पाऊस कायम राहणार असून ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. तसंच, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत पाऊस असणार आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात व मराठवाडा, विदर्भात हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.

वाचाः

पश्चिम किनारपट्टी, घाट भाग व मुंबईत ढगाळ वातावरण असून पुढील २४ ते ४८ तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, असल्याच हवामान खात्यानं म्हटलं आहे.

वाचाः

ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या पावसानं राज्यात धुमाकुळ घातला होता. कोल्हापूरसह कोकणातही पावसानं चांगलाच जोर धरला होता. या तीन दिवस सलग झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. कोल्हापूरातही पंचगंगा नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडल्यानं पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण होत असल्यानं घबराट पसरली होती. तर, धरणधेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळं धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हातील जगबुडी नदीही दुथडी भरून वाहू लागल्यानं काही गावांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबईतही लोकल ट्रेनमध्ये प्रवासी अडकले होते. तर अनेक भागांत पाणी साचले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here