नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता म्हणजे DA वाढीची आतुरतेने वाट पाहत असतात. महिन्या अगोदर यंदा त्यांचा DA किती वाढेल, याबाबत शोध घेण्यास सुरुवात करतात. वाढीव महागाई भत्ता पगारात आला की तो कुठे वापरायचा हे कर्मचारी आधीच ठरवतात. अखेरीस आपण सर्व पगार वाढण्याची वाट पाहत असतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ केली जाते. पहिला जानेवारी आणि दुसरा जुलै पासून महागाई भत्ता वाढतो.जानेवारी २०२३ पासून लागू झालेली डीए वाढ सरकारने मार्च २०२३ मध्ये जाहीर केली होती. सरकारने यावेळी महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करत DA ४२ टक्क्यांवर नेला होता. आणि आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याची भेट मिळणार आहे.नवीन महागाई भत्ता जुलैपासून लागूआता नवीन महागाई भत्ता जुलै २०२३ पासून लागू होईल, ज्याची घोषणा सरकार ऑक्टोबरमध्ये करू शकते. मात्र, यावेळी किती वाढ होणार हे जाणून घेण्याची सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. महागाई भत्त्यात वाढ महागाईच्या आधारावर केली जाते. औद्योगिक कामगारांच्या महागाईच्या आकडेवारीच्या आधारे DA वाढीची गणना होते. कामगार मंत्रालयाचे कामगार ब्युरो अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (औद्योगिक कामगार) डेटा जारी करते.DA किती वाढणार?AICPI-IW च्या अलीकडच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये निर्देशांक घसरला होता. मात्र, मार्चमध्ये निर्देशांक वाढून १३२.७ अंकांवरून १३३.३ अंकांवर पोहोचला. अशा प्रकारे त्यात ०.६ ने वाढ झाली. तर महिन्या-दर महिन्याच्या आधारावर निर्देशांक ०.४५% वाढला असून वर्ष-दर-वर्ष आधारावर ०.८० % वाढ झाली. औद्योगिक कामगारांच्या महागाईच्या आकडेवारीनुसार जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढला पाहिजे.तर अद्याप एप्रिल, मे आणि जूनचे आकडे येणे बाकी आहे. या तीन महिन्यांत AICPI-IW अशीच वाढ होत राहिल्यास महागाई भत्ता २% वाढू शकतो. अशाप्रकारे ६ महिन्यांत महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ झाली पाहिजे. म्हणजे जुलै २०२३ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४२+४=४६% महागाई भत्ता मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here