नाशिक : सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी निरनिराळ्या तऱ्हेच्या शक्कल वापरल्या जातात. परंतु इथे थेट न्यायालयाचीच फसवणूक करण्यात आली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या तारखेबाबत माहिती घेण्यासाठी आलेल्या पीडित महिलेला दावा निकाली निघाल्याची माहिती देण्यात आली. या माहितीनंतर पत्नीला धक्का बसला आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला.जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या लोकअदालतीत एका पतीने चक्क न्यायालयासमोर तोतया पत्नी उभी करून घटस्फोटाचा खटला मागे घेत असल्याची बतावणी करून न्यायालयाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संशयित राहुल दत्तू सानप याच्याविरोधात त्याची पत्नी रूपाली राहुल सानप ऊर्फ रूपाली सुधाकर नागरे (वय ३५ वर्ष) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तू मला आवडत नाहीस, निघून जा, दुसरं लग्न करायचंय; पतीचे बोचरे शब्द, पत्नीने आयुष्य संपवलं
रूपाली राहुल सानप यांनी न्यायालयात राहुल याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी दावा दाखल केला होता. हे प्रकरण लोकअदालतीत आलेले असतान बुधवारी (दि.७) संशयित राहुल सानप याने त्याची पत्नी रूपाली ऐवजी दुसरीच महिला न्यायालयासमोर उभी करून तीच रूपाली असल्याचं भासवले. तसेच संशयित महिलेकडून तिची घटस्फोटाची मागणी नसून आपसात वाद मिटविणार असल्याची साक्ष नोंदवून घेत खोटी स्वाक्षरी करून न्यायालयाची फसवणूक केली.

मुलगी जन्मापासून बेघरच असते का? ; दिव्या पुगावकरने पत्रातून मांडली घटस्फोट घेऊ पाहणाऱ्या तरुणीची व्यथा

या प्रकरणी रूपाली राहुल सानप ऊर्प रूपाली सुधाकर नागरे (रा. टाकळी तपोवन लिंक रोड) यांनी वकिलाच्या माध्यमातून सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर पती राहुल दत्तू सानप याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी सानप याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सरकार वाडा पोलीस करीत आहेत.

Wife Murder : जेवताना वाजलं, नवऱ्याने बायकोला जागीच संपवलं, बॉडी बाथरुममध्ये ठेवली अन्…
दरम्यान या प्रकरणात कागदपत्रांची माहिती मागवण्यात आली असून त्यामध्ये खोट्या सह्या केल्याचे समोर आले. प्रथम दर्शनी फसवणूक केल्याचे दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here