नवी दिल्ली: टीम इंडियाचा दमदार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याची कमी यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात संघाला नक्कीच जाणवणार आहे. आता तर केएल राहुलही संघातून बाहेर झाला आहे. पण आता ऋषभ पंतच्या दुखापतीची मोठी अपडेट समोर आली आहे. ऋषभ आपल्या दुखापतीने अपडेट सोशल मिडीयावरून कायमच सर्वांना देत आहे. आता त्याने असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला आहे.ऋषभ पंत डिसेंबर २०२२ पासून दुखापतीने त्रस्त आहे. डिसेंबरच्या अखेरीस त्याचा भीषण कार अपघात झाला. यामुळे त्याच्या कारलाही आग लागली. वास्तविक, त्याची कार दुभाजकावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला. या कार अपघातानंतर पंत याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, आता ऋषभ पंत आणि टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पंत पहिल्यांदाच कोणत्याही आधाराशिवाय चालताना दिसला.

केएल राहुल WTC मधून बाहेर, लवकरच करणार शस्त्रक्रिया; पोस्ट करत स्वतः दिली मोठी माहिती
पहिल्यांदाच आधाराविना चालला ऋषभ पंत

ऋषभ पंतला दुखापत झाल्यापासून तो चालण्यासाठी काठी किंवा क्रॅचचा वापर करत होता. त्याचवेळी, पंतने शुक्रवारी, ५ मे रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंत आधार घेत असलेली काठी फेकून कोणत्याही आधाराशिवाय चालताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये KGF चित्रपटाचे थीम साँगही वाजत आहे. यासोबत हा व्हिडिओ शेअर करताना पंतने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Happy, no more crutches day’. २५ वर्षीय पंत सध्या बेंगळुरू येथील एनसीए अकादमीमध्ये दुखापतीतून सावरत आहे. एनसीएमध्ये आपल्या दुखापतींवर काम करत पुनर्वसन करत आहे.


दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर

ऋषभ पंत दुखापतीमुळे आयपीएल २०२३ चा भाग होऊ शकला नाही. यामुळे त्याच्या संघ दिल्ली कॅपिटल्सचेही मोठे नुकसान झाले आहे. पंतच्या अनुपस्थितीत, दिल्ली सध्या पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर (१०) आहे. कॅपिटल्सने आत्तापर्यंत खेळलेल्या ९ पैकी ६ सामने गमावले आहेत, तर ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे पंत आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही दिसणार नाही. त्याचबरोबर आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही या स्टार यष्टीरक्षक फलंदाजाला खेळणे कठीण आहे. पंतया दुखापतीतून रिकव्हर होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे लवकरच संघात परतेल, अशी आशा आहे.

विराटचा मेलबर्नमध्ये वाढदिवस साजरा, खास केक कापून केलं सिलेब्रेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here