ठाणे: जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला असून मंगळवारी नव्याने १०५१ रुग्णांची वाढ झाल्याने बाधितांचा एकूण आकडा १ लाख २०९ इतका झाला आहे. यापैक्की ८२ हजार ९२० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या १४ हजार ४५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ( )

वाचा:

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, ही बाब दिलासादायक असली तरी दुसरीकडे दररोज रुग्णांच्या मृत्यूचा समोर येणारा आकडा चिंता वाढवणारा आहे. मंगळवारी ५४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा आकडा २ हजार ८३१ वर गेला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये दिवसभरात १७ (एकूण मृत्यू २२२), ठाणे ४ (७०४), १० (४५८), ७ (४७८), मिरा-भाईंदर ६ (३२४), उल्हासनगर २ (१६१), भिवंडी ३ (२६२), अंबरनाथ २ (१६८), बदलापूर २ (५४) रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

वाचा:

दरम्यान, ठाणे शहरात मंगळवारी १७३ नवे करोना रुग्ण आढळले असून एकूण करोना बाधितांची संख्या २१ हजार ४९९ वर पोहचली आहे. नवी मुंबईमध्ये २७८ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या १९०३३ इतकी झाली आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीमध्ये करोनाचे १९६ नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या २२,८४९ वर पोहचली आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट ६८.७९ टक्क्यांवर

राज्यात आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज २५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,०४,२३३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here