नवी दिल्ली: भारताचा स्टार भालाफेकपटू ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने दोहा येथे आयोजित डायमंड लीगची सुरुवात विजयाने केली. नीरज या स्पर्धेचे विजेतेपद कायम राखण्यासाठी इराद्याने मैदानात उतरला आहे. निरजने २०२२ मध्ये सप्टेंबर महिन्यात स्वित्झर्लंड येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. या वर्षी देखील त्याने दमदार कामगिरी करत दोहा येथे ८८.६७ मीटर लांब भाला फेकला.निरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर लांब भाला फेकला. त्याच्या करिअरमधील हा चौथ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी आहे. अखेरपर्यंत तो क्रमवारीत अव्वल स्थानी होता. या कामगिरीसह निरजने गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एडरसन पीटर्स झालेल्या पराभवाचा बदला देखील घेतला. पीटर्स दोहा डायमंड लीग २०२३ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तर भारताच्या गोल्डन बॉय नीरजने बाजी मारली. नीरज या स्पर्धेत २०१८ साली सर्वप्रथम भाग घेतला होता, तेव्हा तो चौथ्या स्थानी राहिला.

कर्णधाराच्या एका निर्णयाने अखेरच्या ओव्हरमध्ये झाला चमत्कार; विजयाचा घास हिरावून घेतला
ऑलिंपिक रौप्य पदक विजेता आणि चेक प्रजासत्ताकचा जॅकब वडलेज्चने ८८.६३ मीटर लांब भाला फेकला. जॅकबने टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्य जिंकले होते. गेल्या वर्षी त्याने डायमंड लीगमध्ये ९०.८८ मीटल लांब भाला फेकला होता.

IPLमध्ये परदेशी कर्णधाराने भारतीय खेळाडूचा गेम केला; टीम इंडियाच्या सुपर स्टारला बाहेर केलं अन्…
नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवला होता. ७ ऑगस्ट २०२१ रोजी त्याने ही कामगिरी केली होती. ऑलिंपिकमध्ये भारताला ट्रॅक आणि फिल्ड प्रकारात मिळालेले हे दुसरे वैयक्तीक सुवर्णपदक होते. टोकियोत नीरजने ८७.५८ मीटर लांब भाला फेकला होता. निरजने स्टॉकहोम डायमंड लीग स्पर्धेत ८९.९४ मीटर लांब भाला फेकला होता. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

दोहा येथे झालेली ही स्पर्धा डायमंड लीग २०२३चा पहिला टप्पा आहे. याची अंतिम फेरी १६ आणि १७ सप्टेंबर रोजी युजीन येथे होणार आहे. प्रत्येक भालाफेकपटूला पहिल्या स्थानासाठी ८ गुण, दुसऱ्या स्थानासाठी ७, तिसऱ्या स्थानासाठी ६ आणि चौथ्या स्थानासाठी ५ गुण मिळतात.

क्रिस गेलला एअरपोर्टवर पाहाताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here