पुणे : शरद पवार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली अस्वस्थता दूर झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीतील घडामोडींबद्दल रोहित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी उत्तरं दिली. महाराष्ट्राच्या लोकांच्या इच्छेनुसार पवार साहेबांनी माघार घेऊन पुढे आता लढायचं आणि कार्यकर्त्यांना घेऊन लढायचं. आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत. नेहमीच त्यांच्या विचाराने चालणारी लोक आहोत. प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात तिथे असलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पवार साहेबांचं अतिशय प्रेमाने सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आणि हीच खरी पवार साहेबांची ताकद आहे, असं रोहित पवार म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याची भीती होती?

पवारांनी राजीनामा मागे घेतला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडेल अशी भीती होती? अशी चर्चा सुरू होती. यावर रोहित पवार यांनी उत्तर दिलं. ‘असं कोण म्हणलं? कुठे तरी काही लोकांनी लिहिलंय, व्हाट्सअॅपवर स्प्रेड झालं आहे. काही लोक उगाचच अशा पद्धतीने चर्चा करत आहेत. तुम्ही बघितलं तर कमिटीत सगळीच लोक होती. आणि निवड समितीचा निर्णय एकमताने झाला आणि पवार साहेबांनी माघार घेतली म्हणून अफवांवरती विश्वास ठेवणे हे योग्य नाही’, असं रोहित पवार म्हणाले.

अजित पवार नाराज असल्याची चर्चा?

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा मागे घेतल्याचं जाहीर केलं. पण यावेळी अजित पवार त्यांच्यासोबत दिसले नाही. शरद पवारांनीही पत्रकारांना उत्तर दिलं. पण अजूनही अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यावर रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. तुम्ही जर बघितलं तर समितीमध्ये स्वतः दादा होते. मी जेव्हा सिल्व्हर ओकला उपस्थित होतो, तेव्हा पवार साहेब तिथे उपस्थित होते. आणि जेव्हा सर्व नेते आले. तेव्हा पाहिले तिथे येणारे दादाचं तिथे होते. आणि दादांनी स्वतः तिथे पवार साहेबांसोबत चर्चा केली. समितीमध्ये काय आणि कसे निर्णय झाले, याची माहिती दिली. आणि त्या बैठकीत ठरले की ठराविकच लोक पत्रकार परिषदेला जातील. आणि म्हणून ठराविकच लोक पत्रकार परिषदेला होते. नाराजी असं काय तुम्हाला जे वाटतं असं काही नाही, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘वेगळ्या’ विचाराचा गट नाराज
दादा माझ्या मतदारसंघांमध्ये येत जात असतात. माझ्या मतदारसंघांमध्ये अनेक कार्यक्रम असतात. तसेच तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी दादा हे स्वतःहून तिथे जात असतात. त्यामुळे दादा शेवटी विरोधी पक्षनेते आहेत. आमचे नेते आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये ते कधीही जाऊ शकतात, असं रोहित पवार म्हणाले. अजित पवार हे रोहित पवारांच्या मतदारसंघात दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावर रोहित पवारांनी स्पष्ट केलं.

जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बढती? अजित पवार गटाला शांत करण्याचा प्रयत्न?
जयंत पाटील भाजपमध्ये जाणार?

जयंत पाटील यांची भाजप सोबत जाण्याची इच्छा आहे? असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला. जयंत पाटील असे कुठे बोलले? अशी निव्वळ चर्चा आहे आणि चर्चाच राहणार आहे. एकनाथ शिंदेंचा जो गट फुटला आहे. लोकांचं जनमत शिंदे गटाच्या आणि भाजपच्या विरोधात आहे. आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अशी कुठेही प्रथा नव्हती, एखादा पक्ष फोडून सत्ता स्थापन करायची. ही सर्व परिस्थिती पाहताना भाजपच अस्वस्थ झालेला आहे. त्यांना वाटू लागले की आपल्याला येणाऱ्या निवडणुकांमध्ये पराजयला समोर जावं लागेल, याची भीती भाजपला आहे. म्हणून त्यांनीच कादचित ह्या राजकीय पुड्या माध्यमांमध्ये सोडल्या असाव्यात. त्यामुळे अशा चर्चा होत आहेत, असं म्हणत रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

राष्ट्रवादीच्या बैठक नवीन उत्तराअधिकाऱ्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली?

बैठकीमध्ये अशी काही चर्चा झाली नाही. पण बैठक जेव्हा होत असते तेव्हा चर्चा तर होणारच. चर्चा तिथे संविधानिक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने, सगळ्यांना मत मांडण्याचा अधिकार तिथे असल्यामुळे विविध लोकांनी विविध विषय तिथं मांडले असावेत. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकमुखाने, एकमताने निर्णय घेतला गेला. पवार साहेबांनी माघारी घेतलीच पाहिजे आणि तो निर्णय नंतर पवार साहेबांनी सुद्धा लोकांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या हट्टापायी आणि या महाराष्ट्राच्या योग्य आणि चांगल्या राजकीय भविष्यासाठी त्यांनी निर्णय मागे घेतला, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here