पुणे : पुण्याजवळील वाघोली येथे उबाळे नगर येथील ‘शुभ सजावट’ या सभा मंडपाला आग लागल्याची घटना घडली आहे. सभा मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला असून त्याचे मृतदेह आढळल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.या घटनेप्रकरणी प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाघोलीजवळ असलेल्या उबाळे नगर परिसरात लग्नाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. या आगी बाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दखल झाल्या. या आगीमध्ये चार सिलिंडर फुटल्याची माहिती जवानांना मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत जवानांना तीन कामगारांचे मृतदेह आढळून आले. या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

आग लागलेल्या गोडाऊनच्या शेजारीच चारशे सिलिंडर भरलेले गोडाऊन आहे. मात्र सुदैवाने या भागात कुठलाही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मृतदेह पुढील कारवाईसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हे कामगार या मंडपात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आगीची तीव्रता एवढी भयानक होती की आगीचे लोट बाहेरपर्यंत पसरले होते.

अजित पवार नाराज असल्याची चर्चा? रोहित पवारांनी बैठकीत काय झालं ते सर्वांना सांगितलं
पिंपरीतील बँक ऑफ बडोदा शाखेला आग

दुसरीकडे खराळवाडी, पिंपरी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला आग लागल्याची घटना घडली होती. पहाटे दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत १० लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आला आहे. महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, मोठे नुकसान झाले आहे.
Mumbai Pune Highway : मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी: अपघात रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here