नवी दिल्ली : साप, उंदीर, ढेकणं आणि पक्षीही यापूर्वी विमानातन आढळून आले आहेत. आता विमानात एका महिला प्रवाशाला विंचू चावल्याची घटना घडली आहे. विमानात विंचू चावल्याची ही पहिलीच घटना असावी. विंचू दंशाने पीडित महिलेला तातडीने उपचार देण्यात आले. विमानतळावर विमान उतरताच पीडित महिलेला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.एअर इंडिया नागपूर-मुंबई (AI 630) या विमानात २३ एप्रिलला प्रवासी महिलेला विंचू चावल्याची ही घटना घडली होती. महिलेला विंचू चावल्यानंतर मुंबई विमानतळाला याची माहिती देण्यात आली आणि तिच्या उपचाराची व्यवस्था केली गेली. मुंबई विमानतळावरील वैद्यकीय पथकाने पीडित महिलेला तपासलं. यानतंर तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचारानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. आता तिची प्रकृती चांगली असल्याचं संबंधित महिलेल्या निकटवर्तीयांनी सांगितलं. Bengal Cat: दिल्ली-हैदराबाद प्रवासात मांजर बेपत्ता, ट्रान्सपोर्ट कंपनीला भरावे लागणार १.६ लाख; प्रकरण काय? या प्रकरणी एअर इंडियाने पत्रक काढून माहिती दिली आहे. विमानातील प्रवाशाला विंचू चावल्याची अतिशय दुर्मिळ आणि अनपेक्षित घटना घडली. विमान मुंबई विमानतळावर उतरताच पीडित महिलेला डॉक्टरांनी तपासलं. त्यानंतर तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. उपचारानंतर महिला प्रवाशाला डिस्चार्ज देण्यात आला. महिलेला विंचू चावल्यानंतर नियमांनुसार विमानाची तपासणी करण्यात आली आणि विंचवाला पकडण्यात आलं. महिला प्रवाशाला झालेल्या वेदना आणि त्रासाबद्दल आम्ही दिलगिर आहोत, असं एअर इंडियाने पत्रकात म्हटलं आहे.
बाईंचा बर्थ डे, वाजले बारा! ‘डिओ’ मारताच विद्यार्थिनी बेशुद्ध; २२ जणी हॉस्पिटलात, काय घडलं? यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये गल्फ-इंडिया फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये एक छोटा पक्षी आढळून आला होता. विमान लँड झाल्यानंतर पक्षाला विमानातून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोलकाताहून दुबाईला जाणाऱ्या विमानात साप आढळून आला होता. कढीपत्ता असलेल्या मालवाहू भागात हा साप आढळला होता. विमानांमध्ये उंदीर दिसण्याचे प्रकार आता सामान्य झाले आहेत. भारताला परत निघण्यापूर्वी बहरीन विमानतळावर विमानाची तपासणी करण्यात आली. यावेळी विमानाच्या कॉकपिटमध्ये पक्षी आढळून आला होता.