चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि स्कूल बॅग भेट स्वरूपात देण्याचा शब्द क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व पत्नी अंजली यांनी दिले होते. दोन महिन्यानंतर ताडोबातील अलीझंझा शाळेला आठवणीने भेट देताना तेंडुलकर दाम्पत्याने दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूकडून ही भेट स्वीकारताना शाळेचे विद्यार्थी देखील आनंदी झाले.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दोन महिन्यांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी पत्नी अंजली व मित्रांसमवेत ताडोबात व्याघ्र सफारीसाठी आला असता अलीझंझा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली होती. तेव्हा विद्यार्थ्यांनी चौथ्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकात असलेला कोलाज नावाचा धडा सचिनची बायोग्राफी वाचून दाखवली होती. स्वत:ची बायोग्राफी विद्यार्थी वाचत असताना सचिन भावूक झाला होता. तेव्हा सचिनची पत्नी डॉ. अंजली हिने शाळेतील विद्यार्थांना गणवेश, स्कूल बॅग देण्याचे कबूल केले होते. विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने काल अलीझंझाच्या जि. प. शाळेत सचिन व पत्नी डॉ. अंजली व मित्र यांनी दोन महिन्यानंतर भेट देत विद्यार्थ्यास स्कूल बॅग दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

CSK vs MI: IPLमध्ये आज एल क्लासिको २.०; मुंबई इंडियन्सचे चेन्नईला ओपन चॅलेंज; मैदान तुमचे…
सचिन विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी येणार असल्याने विद्यार्थी व शिक्षकाने शाळेत रांगोळी व फुलांनी सजवली होती. सचिन शाळेत येताच शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षिका मनीषा बावणकर यांनी पारंपरिक पद्धतीने लाकडी पाटावर पाय धुतले व औक्षवण करत पुष्पगुच्छ देत स्वागत केलं. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून अलीझंझा गाव आहे. गावाची लोकसंख्या ३००च्या घरात आहे. गेटकडे जाण्याच्या मार्गावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत सध्या सतरा विद्यार्थी आहेत.

कर्णधाराच्या एका निर्णयाने अखेरच्या ओव्हरमध्ये झाला चमत्कार; विजयाचा घास हिरावून घेतला
फेब्रुवारी महिन्यात याच मार्गाने सफारी ला जाताना विद्यार्थी खेळताना सचिनला दिसले. त्यांनी गाडी थांबवून शाळेला भेट दिली होती. दरम्यान, विद्यार्थ्यांनी सचिनच्या जीवन चरित्रावर आधारित चौथ्या वर्गाच्या मराठीच्या पुस्तकात असलेला कोलाज नावाचा धडा वाचून दाखवला होता. शुक्रवारी याची आठवण करत सचिनने पुन्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्कूल बॅग व साहित्य भेट दिली. बॅग मध्ये काही साहित्य आहे बॅग आणि साहित्याचा वापर शाळेसाठी करा बरोबर करा असे सांगत खूप शिका असे बोलले. लगेच पंधरा मिनिटानी सचिन तेंडुलकर अलीझंझा गेटमधून सफारीला निघाले.

Harry Brook : एका मॅचचा हिरो ठरतोय संघासाठी डोकेदुखी; १३ कोटींच्या खेळाडूला किती काळ पोसणार
शाळेला सचिन तेंडुलकर भेट देऊन स्कूल बॅग देणार असल्याचे माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्या मुळे विद्यार्थी आनंदी होते. सचिन तेंडुलकरने शाळेत प्रवेश केला तेव्हा विद्यार्थ्यांनी संवाद साधत सचिनला गराडा घातला. सचिनने प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या हाताने स्कूल बॅग दिली तेव्हा विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. सचिनने शाळेला दुसऱ्यांदा भेट दिली व त्यांनी दिलेला शब्द पाळला हा अविस्मरणीय क्षण असून शाळेच्या इतिहासात कधीही न विसरणारा क्षण असल्याचे शिक्षकांनी म्हणाले.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here