चेन्नई: आयपीएलमध्ये शनिवारी डबल हेडर सामन्यातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने असणार आहेत. प्लेऑफची शर्यत पाहता सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. आजचा सामना जिंकून दोन्ही संघांना गुणतालिकेत दुसरे स्थान गाठण्याची संधी आहे. मात्र, चेपॉकमध्ये धोनीच्या संघाशी मुकाबला करणं कुणालाही सोपं राहिलेलं नाही. पण चेपॉकमध्ये चेन्नईचा मुंबईविरुद्धचा विक्रम फारसा बरा नाही. >> चेन्नईसाठी आनंदाची बातमी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी सीएसकेला मोठा दिलासा मिळाला आहे. CSK चा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. स्टोक्स तंदुरुस्त असूनही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे सोपे जाणार नाही.>> चेपॉकमध्ये मुंबई इंडियन्सचा जबरदस्त रेकॉर्डचेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मुंबईचा रेकॉर्ड CSK पेक्षा मजबूत आहे. या मैदानावर दोन्ही संघांमधले गेले पाच सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत.>> दुसऱ्या स्थानासाठी टक्कर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात गुणतालिकेत दुसरे स्थान गाठण्यासाठी ही लढत आहे. आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असेल. इतकंच नाही तर त्याच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्यताही वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here