ब्राझीलिया : आपला घटस्फोट साजरा करण्यासाठी बंजी जम्पिंगला गेलेल्या तरुणाने अक्षरशः मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहिला. बंजी जम्पिंगची दोरी तुटल्याने तरुण जवळपास ७० फूट खाली कोसळला आणि त्याची मान मोडली. ब्राझीलमधील कॅम्पो मॅग्रो येथील लागोआ अझुल (ब्लू लॅगून) येथे गेलेला २२ वर्षांचा राफेल डॉस सॅंटोस टोस्टा याची मान आणि कमरेजवळ मणका फ्रॅक्चर झाला.११ फेब्रुवारी रोजी ब्राझीलमधील पर्यटन स्थळावर जात राफेल बंजी जम्पिंग केले. आपल्या घटस्फोटाचं सेलिब्रेशन करण्यासाठी त्याने हा पर्याय निवडला.
बंजी जम्पिंगप्रमाणेच असलेल्या या अॅक्टिव्हिटीत फ्री-फॉलिंग अनुभवल्यानंतर तुम्हाला “ह्युमन पेंडुलम”प्रमाणे झोके घेता येतात.

“घटस्फोटानंतर मला जीवनाचा प्रत्येक प्रकारे आनंद घ्यायचा होता. मी खूप वेड्यावाकड्या गोष्टी करत सुटलो होतो. मला माझ्या आयुष्याची अजिबात किंमत नव्हती.” अशी प्रतिक्रिया राफेलने या अपघातानंतर बोलताना दिली होती.

आई आम्ही येतो गं! माऊलीचा आशीर्वाद घेऊन कुटुंब निघाले, पण कोणीच परतलं नाही; ११ जणांचा अंत
राफेल त्याच्या २२ व्या वाढदिवसाच्या तीन दिवस आधी चुलत भाऊ आणि मित्रासोबत ब्रिज स्विंग करायला गेला होता. दोरी तुटल्यामुळे तो उंचावरुन तलावात पडला. ही दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत. अपघातात त्याची मान आणि कमरेचा मणका फ्रॅक्चर झाला, त्याच्या पाठीला आणि चेहऱ्याला दुखापत झाली. तसंच खाली पडताना इतरही जखमा झाल्या.

बोरघाटातील अपघातातून बचावलेल्या मुलाला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला

या दुर्घटनेला आता जवळजवळ तीन महिने झाल्यानंतरही, अनेक फिजिओथेरपी सत्रांनंतरही, राफेल अजूनही त्रस्त आहे. तो अजूनही जड वस्तू उचलू शकत नाही, शरीराच्या काही भागांत त्याला वेदना जाणवते आणि अशक्तपणाही जाणवतो. मानसिक आघातही कायम आहे. तीन महिन्यात तो नोकरीवरही गेलेला नाही.

२६ वर्षीय मैत्रिणीची हत्या, कल्पनेपलिकडच्या ठिकाणी पुरले बॉडीचे तुकडे, कारण ठरलं फक्त…

उडी मारण्याआधी आमचे हास्यविनोदही झाले होते. जर दोरीला माझं वजन पेलवलं नाही तर, असं आम्ही हसत म्हणालो होतो. अपघातानंतर मला शुद्ध आली तेव्हा मी पाण्यात पडलो होतो. लोकांनी मला सावरत काठावर आणलं. मी आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या वेदना अनुभवल्या, असं राफेलने सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here