कानपूर : पतीने पत्नीला वकिलासोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. पतीने या घटनेचा व्हिडिओही शूट केला. मात्र पत्नीनेच पतीवर दादागिरी करण्यास सुरुवात केली.संबंधित पती घरी पोहोचला, तेव्हा पत्नी आपल्या वकील मित्रासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती. महिलेच्या पतीला पाहून वकील घाबराघुबरा झाला. त्याने धावत जाऊन पँट घातली आणि बेल्ट लावू लागला. तर महिलाही दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन जीन्स घालायला लागते. पतीने तिला अडवण्याचा प्रयत्न केला असता, काही झालं नसल्याच्या आविर्भावात ती ‘अरे कपडे तर घालू दे’ असं म्हणते. महिलेच्या चेहऱ्यावर पश्चातापाची भावना नसल्याने पतीही चकित होतो. महिला आरामात तयार झाल्यानंतर उलट नवऱ्यालाच म्हणते की ‘तुझी फोटोग्राफी करुन झाली असेल तर निघायचं का?’

संबंधित पती आरपीएफमध्ये कॉन्स्टेबल पदावर आहे. तर पत्नीही उत्तर प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल आहे. ती सध्या कानपूरमध्ये तैनात आहे. दोघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथे काऊन्सिलिंग करुन सोडून देण्यात आलं.

२६ वर्षीय मैत्रिणीची हत्या, कल्पनेपलिकडच्या ठिकाणी पुरले बॉडीचे तुकडे, कारण ठरलं फक्त…
बायकोला माझ्यासोबत राहायचं नाही. तिचं वकिलासोबत अफेअर सुरु आहे. तिने माझ्यासह कुटुंबाविरोधात हुंड्याची तक्रार केली आहे. त्यामुळे माझे कुटुंबही त्रासले आहेत, असं नवऱ्याचं म्हणणं आहे. ती प्रियकरासह पोलीस क्वार्टरमध्ये असल्याचं मला समजलं. त्यामुळे पोलिसांना घेऊन तिथे पोहोचलो, तर दोघं नको त्या स्थितीत होते, असं पतीने सांगितलं.

प्रेयसी लग्नासाठी चालढकल करत होती; प्रियकरानं थेट प्रेयसीच्या भाच्यालाच केलं किडनॅप

२०१७ मध्ये दोघांचे लग्न झाले. मात्र पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र पत्नीने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार केली. हुंडा घेतल्याच्या आरोपांनंतर महिलेच्या सासऱ्यांना तुरुंगवासही झाला होता.

आई आम्ही येतो गं! माऊलीचा आशीर्वाद घेऊन कुटुंब निघाले, पण कोणीच परतलं नाही; ११ जणांचा अंत
दोघांनी परस्पर संमतीने लैंगिक संबंध ठेवल्याने तो गुन्हा नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. महिलेविरोधात विभागीय कारवाईसाठी पोलीस आयुक्तांकडे अहवाल पाठवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here