नागपूर : बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना नागपूरमध्ये घडली आहे. आईच्या गैरहजेरीचा फायदा घेत सावत्र पित्याने आपल्याच ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवली. नागपुरच्या सदर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आईच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.क्रूर बापाने आपल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खळबळ उडवून दिली आहे. आईला हातमजुरीचे काम असल्याने तिने मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले. मात्र कामावरून आई घरी परतल्यावर मुलीने आईला आपला त्रास कथन केला. याप्रकरणी आरोपीचा पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या वडिलांना अटक केली.

पुतण्याशी जागेवरून वाद झाला, शेतावर गेलेला काका घरी परतलाच नाही, तपासात धक्कादायक सत्य उघड
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी २५ वर्षीय धीरज तायडे असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ९ वर्षांची आहे. तक्रारदार महिलेची २०२० मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आरोपीशी ओळख झाली होती. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यामुळे महिलेने आरोपी धीरजसोबत प्रेमविवाह केला होता. तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. आरोपी धीरज हा महिला आणि दोन्ही मुलांसह मुंबईत राहत होता आणि तिथे हातमजुरीचे काम करत होता. पाच महिन्यांपूर्वीच तो नागपुरात आला होता. आरोपी हा गेल्या पाच महिन्यांपासून बेरोजगार होता.

काळीज सुन्न करणारी घटना! कालव्यात खेळताना लेकरू बुडू लागले, माय वाचवायला गेली, घडले धक्कादायक
आरोपी पतीची पत्नी ही ढाब्यावर काम करण्यासोबतच ती बंगल्यात साफसफाईचे कामही करत असे. त्यामुळे ती रात्री उशिरा घरी यायची. शुक्रवारी महिला कामावरून घरी आल्यावर तिच्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. संशय आल्याने महिलेने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता वडिलांचे हे घृणास्पद कृत्य उघड झाले.

दुकानदार चक्रावले! हिऱ्याची बांगडी खरेदी करायला आल्याचे भासवले, महिलेने चोरली ७१ हजारांची सोन्याची बांगडी
या अगोदर सुध्या मुंबईतही तिच्यासोबत वडील धीरजने हे कृत्य केल्याचे मुलीने आईला सांगितले. या कृत्याची माहिती आईला सांगितली. तर तुझ्या आईला आणि लहान भावाला जीवे मारण्याची धमकी देत मुलीला गप्प राहण्यास सांगितले. त्यानंतर ४ तारखेच्या रात्री सावत्र बापाने पुन्हा घृणास्पद कृत्य केलं. सकाळी चिमुकलीने रडत हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. महिलेने मुलीला सोबत घेऊन सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी धीरजला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here