कर्ज प्रक्रिया शुल्क
कर्जदाराला भरावे लागणारे कर्ज प्रक्रिया शुल्काची किमान आणि कमाल टक्केवारी प्रत्येक बँक सेट करते. कर्जाची प्रक्रिया आणि मंजूसाठी बँकेला काही ओव्हरहेड खर्च करावा लागतो, ज्यासाठी प्रक्रिया शुल्क आकारले जाते. वैयक्तिक कर्जामध्ये कर्ज प्रक्रिया शुल्क एकूण कर्जाच्या रकमेच्या ०.५% ते २.५०% पर्यंत असते. लक्षात घ्या की प्रक्रिया शुल्क प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असते.
पडताळणी शुल्क
कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँकेला कर्जदाराच्या कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेवर विश्वास असणे आवश्यक आहे. सामान्यतः बँका कर्जदाराच्या क्रेडिट योग्यतेची पडताळणी करण्यासाठी तृतीय पक्षांची नियुक्ती करतात, जे ग्राहकाचा क्रेडिट अहवाल आणि कर्ज परतफेडीचा इतिहास तपासतात. या प्रक्रियेसाठी बँक कर्जदाराकडून पडताळणी शुल्क आकारते.
EMI बाऊन्स दंड
वैयक्तिक कर्जदारांनी वेळेत EMI पेमेंट करण्यासाठी खात्यात पुरेसा निधी ठेवला आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. जर ईएमआय बाउन्स झाल्यास किंवा उशिरा भरल्यास बँका दंडात्मक कारवाई करू शकते. त्यामुळे, कर्जाची त्वरीत परतफेड करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुम्ही सहजपणे भरू शकणारी EMI रक्कम निवडा. कोटक महिंद्रा बँक EMI बाउन्सवर ५०० रुपयेपेक्षा जास्त शुल्क आकारते, तर, IDFC फर्स्ट बँक प्रति ईएमआय बाउन्स ४०० रुपये आकारते.
जीएसटी कर
कर्ज मंजूरी किंवा परतफेडीच्या कालावधीत ग्राहकाला कोणत्याही अतिरिक्त सेवेची आवश्यकता असल्यास त्याला GST कराच्या रूपात नाममात्र शुल्क भरावे लागते.
प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर दंड
तुम्ही कर्जावर भरलेल्या व्याजातून बँकांना पैसे मिळतात. तुम्ही तुमच्या कर्जाची देय तारखेपूर्वी प्रीपेमेंट केल्यास तुमच्या बँकेचे नुकसान होऊ शकते. हाच तोटा भरून काढण्यासाठी तुमची बँकेला प्रीपेमेंट दंड आकारण्याची मुभा आहे. बँक अनेकदा प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर शुल्क म्हणून ग्राहकांकडून २ ते ४% शुल्क आकारते.