आगर (मध्य प्रदेश) : कुलदेवतेच्या दर्शनासाठी निघालेल्या नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात नववधू आणि नवरदेव यांना गंभीर दुखापत झाली आहे. तर करवली अर्थात नवऱ्याची बहीण मृत्युमुखी पडली. मध्य प्रदेशातील सुसनेर येथील गुराडी बंगला भागात गुरुवारी हा अपघात झाला. लग्नानंतर अवघ्या काही तासातच झालेल्या या अपघातामुळे लग्नघरावर शोककळा पसरली.नातेवाईकांसह प्रवास करणाऱ्या नवविवाहित वधू-वराचा गुरुवारी लग्नानंतर अवघ्या काही तासांतच सुसनेर तालुक्यामधील गुराडी बंगला येथे अपघात झाला. या अपघातात जोडपे गंभीर जखमी झाले आहे, तर वराच्या बहिणीचा मृत्यू झाला.

२६ वर्षीय मैत्रिणीची हत्या, कल्पनेपलिकडच्या ठिकाणी पुरले बॉडीचे तुकडे, कारण ठरलं फक्त…
मध्य प्रदेशातील आगर माळवा येथील तरुणी २५ वर्षीय मोनिका पाटीदार आणि राजस्थानचा २७ वर्षीय कपिल पाटीदार हे राजस्थानातील दिवाळखेडा गावातील पाटीदार समुदायाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात गुरुवारी लग्नबंधनात अडकले. त्यानंतर विवाह विधी आटोपून ते नातेवाईकांसह कुलदेवतेच्या मंदिराकडे निघाले होते.

१५ वर्षानंतर शिक्षकाला पहिला पगार मिळाला, घरी पोहोचतानाच काळाने गाठलं, मुलासह प्रवास थांबला

वाटेत गुराडी बंगलाजवळ त्यांची कार एका जेसीबीला धडकली. यावेळी पिपलिया कुलमी येथील रहिवासी असलेली वराची २६ वर्षीय बहीण अल्पना पाटीदार गंभीर जखमी झाली. सोयत रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अल्पना यांना झालावाड येथे पाठवण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. अपघातात मोनिका आणि कपिल या नवदाम्पत्यालाही गंभीर दुखापत झाली.

बायकोला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याला म्हणते, थांब कपडे घालू दे!
या अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या संपूर्ण घटनेने लग्न सोहळ्यात सहभागी झालेले वऱ्हाडी मंडळी शोकसागरात बुडाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here