नवी दिल्ली: अभिनेत्री दीपिका पादुकोणने जेएनयूच्या आंदोलनात भाग घेतल्याने भाजपचा तिळपापड झाला आहे. भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी तर दीपिकाच्या ” या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं असून ट्विटरवरही #BoycottChhpaak चा ट्रेंड सुरू झाला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी ‘तान्हाजी’ सिनेमा बघणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या ट्विटरवर ‘छपाक’ विरुद्ध ‘तान्हाजी’ असं चित्रं पाह्यला मिळत आहे.

दीपिका आज सायंकाळी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारसोबत जेएनयूत गेली. यावेळी तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वांना एकजुटीने राहण्याचं आवाहनही केलं. दीपिका जेएनयूत दहा मिनिटं होती. दीपिकाने जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यामुळे भाजपने त्यावर आक्षेप घेतला आहे. भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी ट्विट करून ‘छपाक’वर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे. ‘दीपिकाने तुकडे तुकडे गँग आणि अफझल गँगला पाठिंबा दिला आहे. तिच्या सिनेमावर बहिष्कार घाला,’ असं आवाहन बग्गा यांनी ट्विटरवरून केलं. त्यानंतर ट्विटरवर ‘छपाक’चा विरोध सुरू होऊन #BoycottChhpaak हा ट्रेंड सुरू झाला. तर दुसरीकडे काही तरुणांनी दीपिकाचं समर्थन करत तिचा सिनेमा पाहणार असल्याचं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी ‘छपाक’ला पर्याय म्हणून ‘तान्हाजी’ सिनेमा बघण्याचं आवाहन केलं आहे. दीपिकाने तिच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी वापरलेला हा फंडा योग्य नाही. त्यामुळे आम्ही ‘तान्हाजी’ सिनेमा पाहणार आहोत, असं नेटकऱ्यांनी म्हटलं असून ‘तान्हाजी’चे पोस्टरही ट्वविटर मोठ्या संख्येने शेअर केले आहेत.

‘छपाक’ला पाठिंबा देणारे आणि बहिष्काराचं आवाहन करणारे हे ट्विट्स

दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोषसह १९ जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ४ जानेवारी रोजी विद्यापीठातील सर्व्हर रुमची तोडफोड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या आरोपात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे आंदोलनादरम्यान ‘फ्री काश्मीर’ (काश्मीर स्वतंत्र करा) हे पोस्टर झळकवणाऱ्या महक मिर्झा प्रभू या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सुवर्णा साळवे, फिरोझ मिठीबोरवाला, जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि कार्यकर्ता उमर खालिद यांसह एकूण ३१ आंदोलनकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here