तर या भूमिपूजन कार्यक्रमावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती करत सांगितले की, वरती युती झाली आहे. तशीच खाली युती झाली पाहिजे, वरती जसं आपण एकत्र काम करतो तसे, खाली सुद्धा कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, असा सल्ला दिला. यालाच खा.शिंदे यांनी त्याच्या शैलीत उत्तर दिले आणि सांगितले की वरती ही युती झाली आहे, खाली युती झालेली आहे.दोन्ही पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी डोक्यात शंका ठेवू नका, असे सांगितले.
याचं कार्यक्रमानंतर खा.डॉ.शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि सांगितले की महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल, असं म्हणत महाविकास आघाडीचे नेते आधी आमच्यावर टीकाटिप्पणी करत होते, आता एकमेकांवर करतायत, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी इथं आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
महाविकास आघाडीचे नेते दररोज जी वज्रमूठ दाखवण्याचा प्रयत्न करतायत, ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी सुरू आहे. आतमध्ये महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर टीकाटिप्पणी करतात. आधी आमच्यावर करत होते, आता एकमेकांपर्यंत करायला लागले आहेत. मात्र दुसरीकडे लोकांच्या मनातलं सरकार सध्या आलं असून गेल्या दहा महिन्यात वेगवान निर्णय आणि वेगवेगळ्या पॉलिसी आणण्याचं काम या सरकारने केलंय. गेल्या अडीच वर्षातलं सरकार मात्र सुस्त होतं आणि गेल्या अडीच वर्षात काहीच काम झालं नव्हतं. तेच काम आम्ही गेल्या दहा महिन्यात करून दाखवलं. म्हणूनच लोकांसमोर जाताना महाविकास आघाडीची एकी कशी दाखवता येईल? हे शोकेस केलं जातं. मात्र आता येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभा रद्द केल्या असून त्यामुळे ही वज्रमूठ राहते की नाही? हे आपणही पहा, लोकही पाहत आहेत, असं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.
तर अजित दादा तुमच्याकडे येणार आहेत का? असं त्यांना विचारलं असता, मी एक छोटा कार्यकर्ता असून तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, यामध्ये मी जास्त बोलू शकत नाही. अजितदादा इकडे जातायत, तिकडे जातायत, अशा बातम्या मीडियावर दाखवत असून अजित दादांना तरी सांगू द्या ते कुठे जातायत, असं म्हणत त्यांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं. तर त्याचवेळी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मात्र आमच्याकडे कोणीही आलं तरी स्वागतच आहे, असं म्हटलं. यानंतर आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांचा दाखला देत संजय राऊत हे खरोखरच भांडणं लावतात का? असं खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारलं असता, मला अशा माणसाबद्दलचे प्रश्न आपण विचारू नयेत, हे मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, असं म्हणत त्यांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं.
अजित पवारांचं वागणं पाहून पवारांनी राजीनामा मागे घेतला, भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी सुनावलं!