सूरतः १३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीला दत्तक घेणारे वडिल आणि भावासह अन्य तीन जणांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सहा महिन्यांची असताना तिला या कुटुंबाने अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते. तिच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. मात्र, जस जस तिचे वय वाढत गेले तसे तिच्या वडिलासंह, काका, दोन भाऊ आणि अन्य एका युवकाने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. कित्येक वर्षांपासून ते तिच्यावर जबरदस्ती करत होते.

मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला नेले, मात्र तिथे घडले भलतेच, मित्रानेच रचला होता भयंकर कट
पीडित तरुणीला त्रास असह्य झाल्यानंतर अखेर तिने याबाबत तक्रार केली. अडाजन पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केली आहे. पीडितेसोबत घडलेले प्रकार ऐकून पोलिसही सून्न झाले. तातडीने कारवाई करत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

मुंबईकरांना दुर्लक्ष भोवले! २८४० जणांना नोटिसा, तर ६७ जणांवर खटले; तुम्हीही अशीच चूक करताय का?
सूरतचे एसीपी बी. एम. चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गंभीर असून चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात एक अल्पवयीन आरोपीदेखील आहे. सगळ्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे. जे काही तथ्य समोर येतील त्याआधारे पुढील तपास करण्यात येईल. तसंच, अल्पवयीन मुलीची मेडिकल चाचणीही करण्यात येईल.

मुंबईकरांना पाणीदिलासा! बीएमसीकडून खास नियोजन सुरु, तानसा धरणाबाबत घेतला निर्णय

मुलीला विवस्त्र केलं, तिच्यासोबत केलं ते सगळं लिहून ठेवलं; डायरी वाचून पोलीसही हादरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here