डीजेच्या दणदणाटी आवाजामुळे प्रकृती बिघडलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

 

teacher lost life
अहमदनगर: मोठ्या आवाजात डीजे लावायला बंदी असली तरी अलीकडे सण-उत्सवात पुन्हा डीजेचा दणदणाट ऐकायला मिळतो. त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण केवळ त्रासदायकच नव्हे, तर जीवघेणेही ठरत असल्याची उदाहरणे पुढे येत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील एका शिक्षकाला डीजेच्या आवाजामुळे जीव गमवावा लागला आहे. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतील डीजेच्या आवाजामुळे त्रास झाल्याने शिक्षक अशोक बाबूराव खंडागळे (वय ५८) कोमात गेले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूची झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.खंडागळे श्रीगोंदा येथील नारायण आश्रमाचे केंद्रप्रमुख होते. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. हनुमान जयंतीच्या दिवशी ते कर्जत तालुक्यातील कौडाणे गावात गेले होते. तेथे मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. त्याचा त्यांना त्रास झाला. श्रीगोंदा येथे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते कोमात गेले होते. काही काळ श्रीगोंदा येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्याला हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या उपचारांना यश आले नाही. आवाजाचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला होता. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.
धुमधडाक्यात लग्न, मग निरोपाची तयारी; तासाभरात नवरदेवाचा मृत्यू, कुटुंबाला वेगळीच शंका
खंडागळे यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. खंडागळे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. शिक्षकांमध्येही त्यांचा चांगला संपर्क होता. त्यांच्या सेवानिवृत्तीची तयारी सुरू होती. त्यापूर्वीच त्यांचा असा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष संदीप मोटे, शिक्षक नेते गजानन ढवळे यांनी खंडागळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
मी असा चालत येतो! बाजूनं भरधाव ट्रेन जाईल, तू शट कर! रील करण्यासाठी ट्रॅकवर गेला अन्…
खंडागळे यांच्या मृत्यूला थेट डीजेचा आवाजच कारणीभूत आहे का, हे नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. मात्र डीजेचा आवाज ऐकल्यापासूनच त्यांना त्रास सुरू झाला. त्यामुळे ते कोमात गेले होते. खंडागळे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंब, नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून विद्यार्थी वर्गावर शोककळा पसरली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here