नवादा : बिहारच्या नवादा जिल्ह्यांमध्ये रोह ठाणा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे लग्न घरात अससेला आनंद क्षणात शोककळेत पसरला. कारण, नवरदेव आणि नवरीची वरात निघण्याऐवजी दोघांच्याही अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी रात्री श्याम कुमार याची वरात नालंदा जिल्ह्यातील सतुआ गावांत आली होती. गावात लग्न असल्यामुळे मोठा उत्साह होता आणि आनंदाचं वातावरण होतं.श्याम कुमार याचा विवाह गावातल्या पुष्पा कुमारी हिच्यासोबत झाला. लग्नाचा सगळा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला. शनिवारी नवरीची पाठवणी करण्यात आली. यानंतर नवरदेव आणि नवरी यांची गाडी नवादा येण्यासाठी निघाली असता भयंकर प्रकार घडला. नॅशनल हायवेवर गाडी चालली असताना यावेळी समोर येणाऱ्या ट्रॅक्टरने नवरदेवाच्या गाडीला इतक्या जोरात धडक दिली की गाडीचा चक्काचूर झाला.

सावधान! मुंबई-पुणे महामर्गावर सुरू होता भयंकर प्रकार, पोलिसांची मोठी कारवाई; ३ जणांना अटक
हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये नवरा आणि नवरीचा घटनास्थळीच अंत झाला. यामध्ये इतर ३ जण जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर भरधाव वेगात असल्यामुळे खूप जोरात धडक झाली. ज्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहे. लग्नाची वरात निघण्याऐवजी दोघांची अंत्ययात्रा निघाली. सासरी पोहोचण्याआधीच नव्या जोडप्याचा अशा प्रकार अंत झाल्यामुळे गावात एकच शोककळा पसरली आहे.

Solapur Crime: सोलापूरचा अधिकारीच मास्टरमाईंड! साताऱ्याहून २ कंटेनर पुण्यात पाठवले, पोलिसांनी पाहणी करताच फुटला घाम…
दोन्ही कुटुंबियांना अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सगळ्यांना धक्का बसला. पोलिसांच्या मदतीने तातडीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. यानंतर दोघांचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहेत. दरम्यान, या अपघातामध्ये जखमी झालेल्या नातेवाईकांवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

नवऱ्याकडून रोज व्हायचा अमानुष छळ; सफाई करताना पत्नीला सापडला असा कागद ज्याने गेमच पलटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here