खरं तर, यादरम्यान विराट कोहली आणि सौरव गांगुली एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटताना दिसले, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मोसमात प्रथमच जेव्हा दिल्ली आणि आरसीबी संघ आमनेसामने आले तेव्हा विराट कोहलीने त्या सामन्यात सौरव गांगुलीशी हस्तांदोलन केले नाही. तेव्हापासून या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये काहीतरी बिनसले असल्याची बातमी आगीसारखी पसरली, जिथे तिथे चर्चांना उधाण आले होते; इतकेच नव्हे तर त्यांच्यातील जुन्या मतभेदांवरही भाष्य करण्यात आले होते. दोघेही या सामन्यात एकमेकांना ज्यापद्धतीने भेटले ते चाहत्यांना देखील खूप आवडते.

विराट आणि सौरव गांगुली यांच्यातील संघर्षाच्या बातम्या काही नवीन नाहीत. सौरव गांगुली जेव्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होते, तेव्हा हे प्रकरण सुरू होते की त्यांचे कोहलीशी मतभेद आहेत, परंतु या संपूर्ण प्रकरणावर दोघेही उघडपणे काहीही बोलले नाहीत.
राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला
सौरव गांगुली हे दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक आहेत. दिल्लीच्या प्रत्येक सामन्यात ते डगआऊटमध्ये दिसतात. मात्र, या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. या मोसमात, दिल्ली संघाने १० पैकी फक्त ४ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत ते सातत्याने शेवटच्या स्थानावर होते. मात्र, आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर दिल्लीने एका स्थानची झेप घेतली असून ती आता ९व्या स्थानावर पोहोचली आहे. असे असूनही, संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. पण गेल्या तीन सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाने जे कमबॅक केले आहे ते पाहून सगळेच त्यांचे कौतुक करत आहेत.