काही दिवसांपूर्वी त्याने अचानक तिला फूस लावून निर्मनुष्य परिसरात नेले. मुलीला वेगवेगळ्या भुलथापा देऊन वाहनातून तिचे अपहरण केले. आरोपी रोहितने मुलीला घेऊन जालना गाठले. तिथे थांबल्यानंतर त्याने ठिकाण बदलले. तो तिला घेऊन जालनानंतर शिर्डी आणि अन्य शहरात फिरत राहिला. या ठिकाणी आरोपी रोहित याने अल्पवयीन मुलीला ३ शहरात नेत अत्याचार केला.
मुलीला सोडून काढला पळ….
दरम्यान, अचानक १४ वर्षीय मुलगी घरातून निघून गेल्यामुळे नातेवाईकांनी तिचा परिसरामध्ये शोध घेतला. मित्र-मैत्रिणींशी विचारपूस केली. पण तिचा अद्याप शोध लागला नाही. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली. पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होताच पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. यावेळी पोलीस मागे लागल्याचे रोहितला कळताच त्याने मुलीला सोडून दिले आणि त्या ठिकाणाहून पळ काढला.
आरोपीला अटक….
मुलीचे वडीलदेखील खूनाच्या गुन्ह्यात सध्या हर्सुल कारागृहात आहे. दरम्यान, फूस लावून पळून नेत अत्याचार करून सोडून दिलेल्या पीडित मुलीने शहर गाठले. यावेळी घडलेला सर्व प्रकार मुलीने आईला सांगितला. हे संपूर्ण प्रकार ऐकून मुलीच्या आईला धक्काच बसला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून त्याला ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेघा माळी करीत आहे.