चेन्नई: आयपीएल २०२३ मध्ये शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यात पुन्हा एकदा मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा काही विशेष करू शकला नाही. रोहित शर्मा त्याच्या अफलातून फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण यंदाच्या आयपीएलमध्ये त्याची बॅट शांत आहे. त्यातच तो सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. या मोसमात रोहितच्या बॅटमधून धावा पाहायला मिळाल्या नाहीत, अशा स्थितीत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी तो कसा बाद झाला यावर प्रश्न उपस्थित केला आहे.चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने सुरुवातीला २ डॉट बॉल खेळले. पण तिसऱ्या चेंडूवर दीपक चहरने एमएस धोनीच्या साथीने आपल्या जाळ्यात अडकवले आणि विचित्र पद्धतीने रोहित बाद झाला. दीपक चहरने प्रथम संथ गोलंदाजी सुरू केली. त्यानंतर धोनी विकेटजवळ आला. अशा स्थितीत चहरने पुन्हा एकदा स्लो चेंडू टाकला, ज्यावर रोहित शर्माने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. जिथे चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट रवींद्र जडेजाच्या हातात गेला.
शॉट चुकीचा – सुनील गावसकर
रोहितच्या या विकेटनंतर स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करणारे सुनील गावस्कर संतापलेले दिसले. ते म्हणाले की ‘तो मॅचमध्ये आहे असं वाटत नव्हतं’. मी पूर्णपणे चुकीचा असू शकतो पण तो ज्या प्रकारचा शॉट खेळला तो कर्णधाराचा शॉट नव्हता. जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा कर्णधार डावाला चांगले वळण देतो, संघाला चांगली धावसंख्या गाठण्यासाठी तो चांगली खेळी करतो. पॉवरप्लेमध्येच दोन विकेट पडल्या आणि तू फॉर्ममध्ये नाहीस.’

रोहितने ब्रेक घ्यावा – गावस्कर
सुनील गावसकर इथेच थांबले नाहीत, त्यांनी पुढे कर्णधाराला छोटा ब्रेक घेण्याच्या सूचना दिल्या. तो म्हणाला की, ‘तुम्ही फॉर्ममध्ये असाल, तर तुम्ही स्कूप शॉट खेळला पाहिजे हे मलाही समजते. पण जेव्हा तुम्ही शेवटच्या सामन्यात शून्यावर आऊट झालात, तेव्हा तो मोठा फटका असतो, त्यामुळे तुम्ही आधी स्वतःचे खाते उघडण्याचा प्रयत्न करा. पाय चालवण्याचा प्रयत्न करा, झटपट एक किंवा दोन धावा करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर मोठे शॉट्स खेळा.’
अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं
गावस्कर पुढे म्हणाले की- कदाचित तो आधीच काहीतरी वेगळा विचार करून आला असेल आणि आता कदाचित एक छोटा ब्रेक त्याच्यासाठी चांगला ठरेल. पण हा निर्णय त्याला आणि मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाला घ्यायचा आहे.