वरवा गावातील रहिवासी हिरामण यादव यांचा २५ वर्षीय मुलगा राजकुमार यादव याचा विवाह २२ फेब्रुवारी २०२३ रोजी हजारीबागच्या चालकुशा ब्लॉकमधील रश्नी गावातील पूजा देवीसोबत (वय २२) झाला होता. राजकुमार यादव हा मुंबईत कामाला होता आणि आठ दिवसांपूर्वी तो घरी आला होता. गावातील लोक सांगतात की त्याचा मेव्हणा तीन दिवसांपूर्वी येथे आला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये वाद सुरु होता.
नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!
शनिवारी रात्री जेवण करून दोघेही त्यांच्या खोलीत झोपायला गेले. मात्र, सकाळी उशिरापर्यंत ते खोलीबाहेर न पडल्याने नातेवाइकांनी दरवाजा ठोठावला. पण, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी खिडकीतून बघितले तर राजकुमार गळफास घेतलेल्या अवस्थेत होता आणि पूजाचा मृतदेह बेडवर पडलेला होता. त्यानंतर नातेवाइकांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर लोकांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडून नातेवाइकांनी आत प्रवेश केला.
नातेवाइकांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. बरकठ्ठा पोलिस स्टेशनचे प्रभारी विक्रम कुमार यांनी सांगितले की, या जोडप्याच्या मृत्यूची नोंद झाली आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस कुटुंबीयांची चौकशी करून तपास करत आहेत.