छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या मुलाचे ट्रॅक्टर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आमदार पुत्र, माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांचा पाच लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरीला गेला. या घटनेनंतर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक सिद्धांत संजय शिरसाट यांनी स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी स्वतःचा ट्रॅक्टर विकत घेतला. सिद्धांत शिरसाठ यांनी पाच लाख रुपये किमतीत तो विकत घेतला. एम एच २८ एफ.यु ८९२६ असा चोरी गेलेल्या ट्रॅक्टरचा नंबर आहे.

दरम्यान, ३ मे रोजी सिद्धांत शिरसाठ यांच्या कर्मचाऱ्यांनी काम झाल्यानंतर ट्रॅक्टर तंत्रज्ञान नगर येथे उभा केला होता. त्यानंतर कर्मचारी घरी गेला. मात्र दुसऱ्या दिवशी ४ मे रोजी उभा केलेल्या ठिकाणी ट्रॅक्टर दिसला नाही. यामुळे आजूबाजूला विचारपूस केली असता कुठेच ट्रॅक्टर आढळून आला नाही.

बागेश्वर बाबा पोलिसांच्या रडारवर, अंबरनाथमधील कार्यक्रमापूर्वी बजावली नोटीस, दिला इशारा
दरम्यान, याप्रकरणी तात्काळ सिद्धांत शिरसाट यांनी सातारा पोलीस ठाण्यात संपर्क साधून याप्रकरणी माहिती दिली. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आमदार पुत्राचा ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार यांनी दिली.

शेतकरी सकाळी शेतावर गेला तो घरी परतलाच नाही, कुटुंबीयांनी शेतावर जाऊन पाहिले ते धक्कादायक होते
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक या चोरीच्या घटनांमुळे त्रस्त आहे. मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याची ओरड अनेक दिवसांपासून नागरिक करत आहेत. असे असताना आता थेट आमदार पुत्राच्या ट्रॅक्टरची चोरी झाल्यामुळे हा विषय आता तरी प्रशासन गांभीर्याने घेणार का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ऐकावं ते नवलंच! बकरीला बोकडाचे लिंग शिवून तो विकत होता मटण; असा झाला भांडाफोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here