महिलेचा दावा आहे की तिने प्रियकरासोबत मंदिरात लग्न केले आहे. या गोंधळानंतर वधूच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला. यानंतर वधू पक्षाने वराच्या कुटुंबीयांकडे नुकसान भरपाईची मागणी केली. रात्रभर दोन्ही बाजूंकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, कोणीही ऐकायला तयार नव्हतं. अखेर याप्रकरणात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
इतकंच नाही तर या वराची प्रेयसी ही विवाहित आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी तिचे लग्न झाल्याची माहिती आहे. लग्नानंतर काही वर्षांनी ही महिला वराच्या प्रेमात पडली. त्यानंतर महिलेने पतीला सोडले आणि प्रियकरासोबत राहू लागली. वराची प्रेयसी ही ३ मुलांची आई आहे.
घरमालकासोबत बायकोचे अनैतिक संबंध, भाडेकरूने साथीदारासोबत काढला काटा
दोघांनी २०२० मध्ये लग्न केले
विवाहित प्रेयसी रंजू कुमारीने सांगितले की, दोघांचे लग्न २०२० मध्ये माँ मुंडेश्वरी धाम येथे झाले. पहिल्या पतीपासून तिला तीन मुले आहेत. रंजू म्हणते की, वराच्या सांगण्यावरून तिने आधी पतीला सोडले. जेव्हा तिला लग्नाची माहिती मिळाली तेव्हा ती द्वारपूजेच्या वेळी पोहोचली आणि सर्वांना माहिती दिली की तो तिचा पती आहे.
तर ज्याच्यावर हे सर्व आरोप आहेत तो श्रावण कुमार सांगतो की, माझे लग्न ४ मे रोजी होते.लग्नाचे विधी सुरु असताना माझ्या बहिणीची ननंद जिच्याशी माझा काहीही संबंध नाही ती आली. श्रावणने सांगितले की तो कधीही बाहेर गेला नाही किंवा कधीही तिच्यासोबत राहिला नाही. काहीही झाले तरी मी तिच्याशी लग्न करणार नाही.