अहमदनगर: नेत्याने पक्ष बदलला की त्याचे कार्यकर्त्यांवर आणि मतदारसंघातील समर्थकांवर कसे परिणाम होतात, हे तालुक्यात पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात हे बदल पहायला मिळत आहेत. त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटल्यानंतर आता ‘राम राम’ म्हणून नमस्कार करण्याऐवजी ‘जय महाराष्ट्र’ म्हणू लागले आहेत. तर निवडणुकीत गाजलेली ‘भोळ्या शंकरा’ ही रिंग टोन मागे पडून आता ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ने तिची जागा घेतली आहे.

वाचा:

मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेल्या गडाखांनी मागील निवडणुकीतच राष्ट्रवादी सोडून क्रांतिकारी शेतकरी पक्ष स्थापन केला. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या आमदाराचा पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्याने ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपचा उमेदवार समोर असल्याने सोशल मीडियावरून प्रचारावरही भर दिला होता. त्यावेळी त्यांच्या नावाचा समावेश असलेले ‘भोळ्या शंकरा’ हे भक्तिगीत मोठ्या प्रमाणावर गाजले होते. त्यांच्या प्रचारात, मोबाईल रिंग टोनमध्ये या गाण्याचा वापर करण्यात येत होता.

वाचा:

आता गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नेवासा मतदारसंघात विशेषत: सोनई परिसरात वातावरण शिवसेनामय झाले आहे. आतापर्यंत त्यांच्या विरोधात भूमिका घेतली, त्या जुन्या शिवसैनिकांच्या गळी नवे नेतृत्व उतरविणे, त्यांना सोबत घेऊन चालण्याचे आव्हान गडाखांसोबत आहे. त्यामुळेच शिवसेना स्टाइलने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. त्यांचे कार्यकर्ते, समर्थक एकमेकांना भेटल्यानंतर जाणीवपूर्वक ‘जय महाराष्ट्र’ म्हणत आहेत. फोनवरील संभाषणात, सोशल मीडियातील संदेशांतही याचा वापर केला आहे. गडाख यांच्या अधिपत्याखालील संस्थांमधूनही ‘जय महाराष्ट्र’ म्हटले जाऊ लागले आहे. अनेकांच्या मोबाईलच्या रिंग टोन बदलण्यात आल्या आहेत. पूर्वी जसा ‘भोळ्या शंकरा’चा मारा केला जात होता, तसा आता ‘वाघा’चा सुरू झाला आहे.

अर्थात हे सर्व वरकरणी बदल आहेत. वर्षानुवर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संस्कृतीत राहिलेले नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांना स्वत:मध्ये शिवसेनेला अनुकूल असे बदल घडवून आणण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागणार आहेत. याशिवाय आता गडाखांना केवळ नेवासाच नव्हे तर शिवसेना पक्षासाठी जिल्हाभर काम करावे लागणार आहे. सहकारातील एक नेता आपल्याकडे खेचून त्यांना मंत्रिपद देण्यामागे शिवसेनेची ही अपेक्षा नक्कीच असणार, अशीही एक चर्चा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here