वॉशिंग्टन डी.सी.: कोणाचं नशीब कसं बदलेल आणि कधी त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीची कृपा होईल हे सांगता येत नाही. अनेकदा तर व्यक्तीच्या ज्ञानीमनी नसतानाही तो असं काही करतो की क्षणात श्रीमंत होतो. असंच काहीसं या महिलेसोबत घडलं आहे. जिने काहीही विचार न करता सहज म्हणून लॉटरीचं खरेदी केलं आणि त्यानेच तिला कोट्यधीश बनवलं. जेव्हाकी तिचा लॉटरीचं तिकीट खरेदी करण्याचा कुठलाही विचार नव्हता.मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण काहीसे जुने आहे. पण, ते नुकतेच चर्चेत आले आहे. ही महिला ट्रक ड्रायव्हर एका झटक्यात कोट्यधीश झाली. पेट्रोल पंपावर ट्रकमध्ये इंधन भरत असताना हा सर्व प्रकार घडला. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणारी लॉरा कीन काही महिन्यांपूर्वी खरेदीसाठी ट्रक घेऊन बाहेर पडली होती आणि यावेळी तिचा जोडीदारही तिच्यासोबत होता. मात्र, त्यांच्या ट्रकमधील इंधन संपलं होतं. त्यामुळे ते पेट्रोल पंपावर गेले होते. तिथे तिला कळालं की येथे लॉटरीचे तिकीटही विकले जात आहेत. ट्रेन स्टेशनवर थांबताच हाहाकार माजला, लोक खिडक्या तोडून सैरावैरा पळू लागले, VIDEO पाहून हादराल त्यामुळे तिने सहज म्हणून लॉटरीचे तिकीट खरेदी केले. त्यानंतर त्यांनी ट्रकमध्ये इंधन भरलं आणि ते पुढे निघाले. काहीच वेळात लॉराचं नशीब चमकलं होतं. तिला सांगण्यात आलं की जे तिकीट तिने त्या पेट्रोल पंपावर खेरदी केलं त्यावर तिला जॅकपॉट लागला आहे. ती काहीच क्षणात कोट्यधीश झाली होती. तिला ८ कोटींची लॉटरी लागली होती. ती तिच्या ट्रकमध्ये इंधन भरण्यासाठी नॉर्थ कॅरोलिनामधील कर्नर्सविले येथील सेव्हन इलेव्हन गॅस स्टेशनवर थांबले होते, अशी माहिती आहे.
लॉराला तिच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. तिची कहाणी व्हायरल होताच लोकांनी त्या पेट्रोल पंपाचा शोध सुरू केला. नंतर कळले की तिथे लकी ड्रॉचे तिकीट विकले जात होते आणि ते या महिला ट्रक चालक लॉराने घेतले होते. ज्याने ती कोट्यधीश झाले होते.