मुंबई : नवी मुंबईच्या कामोठे मधील व्यंकट प्रेसिडेन्सी हॉटेलच्या टेरेसवर सुरु असलेल्या हुक्का पार्लरमध्ये तुफान राडा झाला आहे. ४ मे रोजी रात्री १० वाजता एका व्यक्तीवर तब्बल २० ते २५ जणांनी जीवघेणा हल्ला केला. सदर घटनेत फिर्यादी जखमी झाला असून त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. आता तो कामोठे मधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
४ तारखेच्या रात्रीच्या सुमारास १० वाजेनंतर फिर्यादी आपल्या मित्रांसह हुक्का पार्लरमध्ये बसला असता, त्या ठिकाणी मुख्य आरोपी आणि त्याचे इतर साथीदार येऊन फिर्यादी याचे नाव विचारले. त्यानंतर आपणच असल्याचे सांगितल्याने फिर्यादीला टेबल, खुर्ची आणि इतर वस्तूने बेदम मारहाण करून घटनास्थळावरून पसार झाले. फिर्यादीला मित्राने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
फिर्यादीच्या मित्राने पोलीस ठाण्याच जाऊन संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी फिर्यादीचा जबाब मिळवला असून, त्यात एकून २० ते २५ जणांनी हा हल्ला केल्याचे सांगितले. त्यातील चार ते पाट जण ओळखीचे असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी सदर घटनेचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असावी, असं सांगण्यात येत आहे. आरोपीला ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. मात्र, अशा टेरेसवर चालू असलेले हुक्का पार्लर कुणाच्या आशीर्वादाने चालत आहेत? आणि या ठिकाणी असे गंभीर गुन्हे घडत आहेत, याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.