ठाणे: कल्याणमधील पत्री पुलासह इतर अनेक पुलांची कामे प्रमाणाबाहेर रखडल्याने संतापली आहे. ‘सरकारी कामाची कासवगती बघता या पुलांना आता हेरिटेज दर्जाच द्यायला हवा,’ असा संतप्त टोला मनसेचे आमदार यांनी हाणला आहे.

कल्याण आणि डोंबिवली या शहरांना जोडणारा पत्री पूल सरकारी कामाच्या दिरंगाईमुळं गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. ब्रिटिशकालीन असलेला हा पूल मोडकळीस आल्यामुळं पाडण्यात आला होता. मात्र, तब्बल दोन वर्षांनंतरही हा पूल उभा राहू शकलेला नाही. त्याचा प्रचंड ताण या भागातील वाहतुकीवर येत असून रहिवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात पुलाच्या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, तीही फोल ठरली आहे.

वाचा:

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार राजू पाटील यांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘कल्याणमधील पत्री पूल, दुर्गाडी पूल असो वा डोंबिवलीमधील कोपर पूल, माणकोली पूल ह्यांना आता हेरिटेजचा दर्जा देण्याची वेळ आली आहे, असा टोला पाटील यांनी हाणला आहे. ‘वर्षानुवर्षे तेच चालू आहे. हैदराबादहून पत्री पुलाचे गर्डर येतात. तारखावर तारखा येतात. पण पुढे काहीच होत नाही. ह्यांच्याकडून लवकर काही शक्य होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं लोकांनी फार अपेक्षा ठेवू नयेत,’ असं पाटील म्हणाले.

‘माणकोली पूल खाडीत अर्धा तरंगताना दिसतोय. बिल कशी काढायची एवढाच यांचा उद्देश दिसतो. अर्धवट काम करायचं. त्याची बिलं काढायची. बाकी काही होवो किंवा न होवो. अशा पद्धतीनं त्यांचं काम सुरू आहे. कामात कुठलीही सलगता नाही. त्यामुळं यांच्याकडून काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. येथील अधिकारी व कंत्राटदारांना दट्ट्या दिल्याशिवाय काम होणार नाही,’ असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here