सैथलवी आणि त्यांचा भाऊ जाबिर हे कुटुंबासोबत गेले नव्हते. तनूर दुर्घटनेत झीनत आणि तिच्या मुलांसह १२ नातेवाइकांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच परप्पनंगडी येथील नागरिकांना धक्का बसला.
बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पाच केंद्रांवर शवविच्छेदन केले जात आहे. थिरुंगडी तालुका रुग्णालय, तिरूर जिल्हा रुग्णालय, मंचेरी वैद्यकीय महाविद्यालय, मलप्पुरम तालुका रुग्णालय आणि पेरिंथलमन्ना तालुका रुग्णालय या पाच केंद्रांवर शवविच्छेदन केले जात आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह लवकरात लवकर नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करत आहोत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
केरळच्या मलप्पुरममध्ये डबल डेकर बोट उलटली; 21 पर्यटकांचा बुडून मृत्यू, 10 जण बचावले
सध्याच्या माहितीनुसार, बोट दुर्घटनेत २२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये सात मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. रविवार असल्याने फिरायला जास्त लोक आल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे. विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दहापैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे.