व्हर्जिनिया: आकर्षक दिसण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय-काय करतील याचा आपण विचारही करु शकत नाही. आता या महिलेलाच बघा, तिने कायमस्वरुपी तरुणी दिसण्यासाठी २०० हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आणि यावर तिने तब्बल ८ कोटींहून अधिक पैसे खर्च केले. ही महिला सहा मुलांची आई आहे. टीव्ही पर्सनॅलिटी आणि मॉडेल लेसी विल्ड म्हणते की प्रत्येक पुरुषाला तिला डेट करायची इच्छा आघे. तर प्रत्येक मुलगी तिचा तिरस्कार करते. ती स्वत:ला प्लास्टिकचं आयुष्य जगणारी ‘मिलियन डॉलर बार्बी’ म्हणते.द सनच्या रिपोर्टनुसार, लेसीचे खरे नाव पॉला थेबर्ट आहे. तिला आता डॉक्टरांनी पुन्हा कुठलीही शस्त्रक्रिया न करण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच लेसी असेही सांगते की ती इतर महिलांनी तिच्यासारख्या जीवनशैलीपासून दूर राहण्याचा सल्ला देते. पण, तिला पुरुषांचे लक्ष वेधून घेणे आवडते.

लेसी ही अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील रहिवासी आहे. ती म्हणतो, ‘मुली माझा तिरस्कार करतात. प्रत्येक मुलाला मला डेट करायची इच्छा आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी प्लास्टिकने मला परफेक्ट बनवल आहे. कारण त्यामुळे मी ३० वर्षांची दिसते.

Rescue Operation: घनदाट जंगलात महिला अडकली, ५ दिवस फक्त दारुवर जगली, VIDEO पाहून थक्क व्हाल
लेसीला ३५ वर्षांचा मुलगा

‘माझा मुलगा ३५ वर्षांचा आहे आणि लोकांना तो माझा बॉयफ्रेंड वाटतो. मी अविवाहित आहे कोट्यधीशांसाठी उपलब्ध आहे. एखाद्याला डेट करणं कठीण आहे. कारण, तो मला माझ्या शरीरामुळे पसंत करेल की माझ्या स्टेटसमुळे, असा प्रश्नही लेसीने विचारला. तसेच, तिने तिच्या तरुण राहण्याचं श्रेय तिच्या कुटुंबाला दिलं आहे.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

लेसी ही सिंगल पॅरेंट आहे, तिने एकटीने तिच्या सहा मुलांना वाढवलं आहे. तिने २०११ मध्ये ट्रू लाईफ या डॉक्यूमेंट्रीत काम केलं आहे. यामध्ये तिची मुलगी टोरीही तिच्यासोबत होती. लेसीने वयाच्या २४ व्या वर्षी तिच्या आयुष्यातील पहिली शस्त्रक्रिया केली होती. तेव्हापासून ती प्लास्टिक सर्जरीची फॅन झाली आहे आणि त्यानंतर तिने तरुण दिसण्याच्या मोहापायी तब्बल २०० शस्त्रक्रिया केल्या आहेत.

आठ महिन्यांपूर्वी लग्न, तीन महिन्यांची गर्भवती; पण एक चूक अन् सुखी भविष्याची सारी स्वप्नं धुळीस मिळाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here