रायपूर: तरुणाच्या मृत्यूचं गूढ पोलिसांनी दोन दिवसांत उकललं आहे. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह आढळला. आरोपी तरुण गेल्या काही महिन्यांपासून मृतासोबत मुलगी म्हणून चॅटिंग करत होता. त्यानं मृत तरुणाकडे पैशांची मागणी केली. आपण व्हॉट्स ऍपवर मुलीशी नव्हे, तर मुलासोबत चॅट करत असल्याचं समजल्यावर तरुणाला धक्काच बसला. त्यानं पोलिसांकडे तक्रार करायचं ठरवलं. त्यानंतर आरोपीनं तरुणाची हत्या केली.ग्राम मेढा कालव्यात एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती डोंगरगढ पोलीस ठाण्याला ५ मे रोजी मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृताच्या गळ्यावर धारदार हत्यारांनी वार केले होते. मृत तरुण आपला पुतण्या असल्याचं पोषण साहू नावाच्या व्यक्तीनं सांगितलं. यानंतर पोलीस तपासाला वेग आला. मृत तरुण कोमेश साहू ३ मे रोजी सकाळी १० वाजता त्याच्या मित्रांसह एका लग्नाला जाण्यासाठी दुचाकीवरुन निघाला होता. मात्र तो घरी परतलाच नाही, अशी माहिती पोषण साहूंनी पोलिसांना दिली.
पॉर्न साईटवर वृद्धानं पाहिली स्वत:ची क्लिप, सोबत शेजारची तरुणी; पायाखालची जमीन सरकली, अखेर..
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी आसपासच्या गावांमधील सीसीटीव्ही फुटेज, कमलेशच्या बँकांचे तपशील तपासले. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी काही संशयितांची चौकशी केली. या दरम्यान पोलिसांना कोमेशच्या मोबाईलचं लोकेशन मेढा गावात सापडलं. कोमेशचा मोबाईल वापरत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी गाठलं. देवेंद्र सिन्हा नावाच्या व्यक्तीनं आपल्याला मोबाईल दिल्याचं त्यानं सांगितलं. यानंतर पोलिसांनी देवेंद्र सिन्हाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली.

आपणच कोमेशची हत्या केल्याची देवेंद्रनं पोलिसांकडे दिली. ‘गेल्या ८ महिन्यांपासून कोमेशसोबत मानसी म्हणून चॅटिंग करत होतो. ३ मे रोजी त्याला मेढा गावात बोलावलं. सकाळी ११ वाजता कोमेश मेढामध्ये आला. आम्ही दोघे संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पुलावर बसलो होतो. तो मानसीची वाट पाहत होता. मीच त्याच्याशी मानसी म्हणून बोलायचो हे समजल्यावर कोमेश संतापला. त्यानं पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली,’ असं देवेंद्रनं सांगितलं.
कथा सुफळ संपूर्ण? कथा वाचकाचा शिष्य यजमानाच्या पत्नीला घेऊन फरार; पळून गेलेली महिला म्हणते..
पोलीस तक्रारीची धमकी ऐकून देवेंद्र घाबरला. त्यानं कोमेशला संपवण्याची योजना आखली. तुझ्यासाठी घरातून पैसे आणतो, असं म्हणत देवेंद्र तिथून घरी गेला. त्यानंतर देवेंद्र चाकू घेऊन आला. अंधाराचा फायदा घेत त्यानं कोमेशवर हल्ला केला. कोमेश जागीच कोसळला. त्याचा मृत्यू झाला. यानंतर देवेंद्रनं कोमेशची बॅग तपासली. त्यात १ लाख रुपये होते. देवेंद्रनं पैसे घेतले आणि बॅग जाळली. हत्येसाठी वापरलेला चाकू झाडीत लपवला. कोमेशच्या मोबाईलमधील चॅटिंग डीलिट करुन त्यानं तो भूपेंद्र सिन्हा नावाच्या व्यक्तीला दिला. तो त्याच्याच गावचा रहिवासी होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here