मुंबईः आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत करोनाचा संसर्ग रोखण्यास आरोग्य प्रशासनाला यश आलं आहे. गेल्या दहा दिवसांपासून धारावीत एकही करोना रुग्णाचा मृत्यू झाला नसून धारावीकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. धारावीत १ एप्रिल रोजी करोना रुग्ण सापडला होता. या रुग्णाचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. त्यानंतर दाटिवाटीचा परिसर असलेल्या धारावीत करोनाचा प्रसार अधिकच वाढत गेला. धारावीत करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं केलेल्या ठोस उपाययोजनांमुळं एप्रिल, मे आणि जूनमध्ये करोनाला वेसण घालण्यात यश आलं आहे.

आता फक्त ८१ करोना अॅक्टिव्ह रुग्ण

महानगरपालिकेनं जारी केलेल्या आकडीवारीनुसार धारावीत आता २ हजार ६३४ करोनाचे रुग्ण आहेत. ज्यामध्ये २ हजार २९५ लोकांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आत्तापर्यंत २५६जणांनी करोनामुळं आपला जीव गमावला आहे. यात एप्रिल महिन्यात ६७ मृत्यू, १५४ मृत्यू मेमध्ये, जूनमध्ये ३७ मृत्यू आणि ७ लोकांचा मृत्यू जुलैमध्ये झाल्याची नोंद आहे. १ ऑगस्टनंतर धारावीत एकाही मृत्यूची नोंद झाली नाहीये तसंच, रुग्णवाढीचा आकडाही घटला आहे. धारावीत सध्या फक्त ८१ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मंगळवारी धारावीत फक्त ८ नवीन रुग्ण सापडले आहेत. जुलैच्या तुलनेने धारावीत करोना रुग्णांची संख्या घटली आहे.

वाचाः

धारावीत ट्रेस, टेस्ट आणि ट्रिटमेंट या फॉर्म्युल्यामुळं करोनावर विजय मिळवणं शक्य झालं आहे. लवकरच हा फॉर्म्युला मुंबईतही यशस्वी होईल. माहिममध्ये करोनाग्रस्तांसाठी २०० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात आळे आहे, जिथं करोनारुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. फिव्हर क्लिनिक, डोर टू डोर सर्व्हे, मोबाइल व्हॅनमुळं रुग्ण शोधणं सोप्पे जात आहे. चेस द वायरस या मोहिमेमुळं करोनाच्या लढ्यात मोठी मदत मिळत आहे.

वाचाः

धारावीचा हा परिसर प्रचंड दाटीवाटीचा आहे. प्रत्येत घरात ८ ते दहा रुग्ण राहतात. लोकसंख्येच्या तुलनेने सार्वजनिक शौचालयांचा अभाव आहे. या परिस्थितीत सोशल डिस्टनसिंगचं पालन करणं कठिण आहे. त्यामुळं जोपर्यंत करोना रुग्णांची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत धारावीत मोहिम सुरु राहणार, अशी माहिती किरण दिघावकर यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here