पुणे : शिवसेनेचं (ठाकरे गटाचे) मुखपत्र सामनामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक ४० आमदारांवर जहरी टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून गेल्यानं आमदारांचे हाल उकिरड्यावरच्या कुत्र्यापेक्षाही बेकार होणार आहे, अशा शब्दांत बंड केलेल्या ४० आमदारांची तुलना ही भटक्या कुत्र्यासोबत करण्यात आली. यावर शिवसेनेचे आमदार आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तर यांनी प्रत्युत्तर देत खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ज्या कुत्र्याला आम्ही आमच्या मतावर राज्यसभेत पाठवलं आणि त्यानंतर तो आम्हाला कुत्रा म्हणत असेल, तर त्याच्या सारखा महाकुत्रा कोणताच नसेल’, असं म्हणत संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.कृषी मंत्री अब्दुल सत्तार पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात विविध कामांसंबंधी बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेच्या बंड केलेल्या ४० आमदारांचे हाल उकिरड्यावरच्या कुत्र्यापेक्षाही वाईट होतील, असं भाष्य सामनाच्या अग्रलेखात आज करण्यात आलं आहे. या टीकेला अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांना त्यांनी फैलावर घेतलं आहे. ज्यांनी अध्यक्षपदासाठी रयतची घटना बदलली ते पक्षाचं अध्यक्षपद कसं सोडतील; बावनकुळेंचा शरद पवारांना टोला संजय राऊत जर कुत्रा असेल तर आमच्या मतावर त्याला आम्ही राज्यसभेवर पाठवलं आहे. कुत्र्यासारखी अवस्था ही संजय राऊत यांची झाली आहे. रोज सकाळी उठून आमच्यावर भुंकण्याचं काम करतो. आम्हला ही वाईट शब्दाचा प्रयोग करता येतो. परंतु आमच्या मतावर त्याला आम्ही राज्यसभेमध्ये पाठवले असेल आणि तो आम्हला कुत्रा म्हणत असेल तर त्याच्या पेक्षा महा कुत्रा कोणीच नसेल, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला.
Pune News : आजी-आजोबांना भेटण्यासाठी आला, झहीरची कालव्यात उडी; घटनेनंतर इनामदार वस्ती हादरली संजय राऊत जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा देऊन निवडून यावं. मी आव्हान करतो आणि मी पण राजीनामा देतो, त्या वेळेस लोकांना कळेल तो कोणाची अवलाद आहे, माणसाची की कुत्राची? अशा पद्धतीने बोलणाऱ्या माणसाने थोडा तरी जिभेला लगाम लावून बोलवं, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी सामनाच्या अग्रलेखावरून संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.