शुक्रवारी रात्री ४७ वर्षीय शत्रुघ्न लाला याच्या डोळ्यात तीन गोळ्या झाडून त्याची शेतकऱ्याने हत्या केली. शत्रुघ्न जागीच ठार झाला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीच्या पत्नीने २०२१ मध्ये लालाच्या मदतीने आपला मुलगा जितेंद्र यांची हत्या केली होती. जिंतेंद्र याने आपली आणि आणि शत्रुघ्न लाला याला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. त्यावेळी शेतकरी काशी हा एका प्रकरणात तुरुंगात होता.
मुलाच्या हत्येनंतर त्याची आई आणि शत्रुघ्न यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. मात्र काशी याला आपल्या मुलाच्या खूनाचा बदला घ्यायचा होता. डिसेंबर २०२ मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काशीने एका वकिलाकरवी लालाला जामीन मंजूर करून दिला. लालाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जामीन मिळाला होता. तेव्हा पासून काशी त्याला ठार मारण्याची संधी शोधत होता.
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, त्यांनी या प्रकरणात काशीच्या विरुद्ध पुरावे गोळा केले आहेत. काशी हा खीरीच्या तुरुंगात कैद होता. एका स्थानिक भांडणात २०२० मध्ये झालेल्या हत्येच्या प्रकरणात तो सहआरोपी होता. सन २०२१ मध्ये त्याचा १४ वर्षीय मुलगा जितेंद्र अचानक घरातून गायब झाला होता. काही दिवसांनंतर त्याचा मृतदेह नदीच्या किनारी सापडला. जितेंद्रचा मृत्यू नदीत बुडून झाला असं पोलिसांना वाटलं होतं. त्यामुळे तेव्हा कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता.