भोपाळ: मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील प्रसिद्ध बांधवगड व्याघ्र प्रकल्पात काहीच दिवसांपूर्वी १५०० वर्ष जुंन रॉक आर्ट आणि २००० वर्ष जुन्या ‘आधुनिक समाजाचा’ पुरावा सापडल्यानंतर काही दिवसांनी, दोन बौद्ध स्तूप सापडले आहेत. इथे अजूनही उत्खनन सुरु आहे.या दोन स्तूपांपैकी एक स्तूप १५ फूट उंच आणि दुसरं १८ फूट उंच आहे. या व्यतिरिक्त, २ आणि ३ व्या शतकातील बौद्ध स्तंभाचे तुकडे, जे महाराष्ट्रातील बेडसे लेण्यांतील चैत्य स्तंभाशी मिळत्याजुळत्या आहेत, ते देखील सापडल्या आहेत. गेल्या वर्षी, एका शोधात अनेक बौद्ध संरचना सापडल्या होत्या ज्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकातील स्तूप होते.

Kerala Boat Accident: कुटुंबातील ३ महिला, ९ मुलांचा केरळ दुर्घटनेत मृत्यू; निम्म्या परिवारासाठी ट्रिप ठरली अखेरची
“यावेळी सापडलेल्या वास्तू अखंड बौद्ध स्तूपांच्या आहेत. हे सामान्य लोक आणि भिक्षू वापरत असत. हे दंडगोलाकार स्तूप आहे आणि त्यात वैशिष्ट्यपूर्ण बौद्ध स्तूपांची सर्व वैशिष्ट्ये आहेत. जसे चौरस व्यासपीठ आणि गोलार्ध. तसेच, यावेळी आणखी एक स्तूप सापडले. या वास्तूच्या शैलीबद्धतेवरुन हे दोन स्तूप सातव्या किंवा आठव्या शतकातील असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे”, अशी माहिती ASI च्या जबलपूर सर्कलचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. शिवकांत बाजपेयी यांनी टाइम्सला दिली.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

“गेल्या वर्षी एक व्होटिव्ह स्तूप, एक बौद्ध स्तंभ आणि काही बौद्ध गुहा सापडल्या होत्या, परंतु आतापर्यंत फक्त दगडी गुंफांचे निवासी पुरावे सापडले आहेत. हा भाग जुन्या काळातील व्यापारी मार्गाचा होता.”

बांधवगडचा लिखित इतिहास इ.स. च्या दुसऱ्या शतकापर्यंतचा आहे. या प्रदेशातून मिळालेल्या शिलालेखाच्या नोंदीवरून हे स्पष्ट होते की तो बराच काळ मघा राजवंशाच्या अधिपत्याखाली होता, असे इतिहासकार सांगतात. मघा राजघराण्यानंतर, गुप्त, प्रतिहार आणि कलचुरीसह इतर अनेक राजवंशांनी या प्रदेशावर राज्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here