बाडमेर : नवरा-बायकोचं नातं म्हटलं की आधी त्यांच्यातील वाद आठवतो. प्रेम प्रकरणातून आणि जोडप्यांच्या वादातून गुन्ह्यांचे अनेक गंभीर प्रकार तुम्ही पाहिले असतील. अशीच एक काळजाचा ठोका चुकावणारी घटना समोर आली आहे. इथे एका विवाहित महिलेने पती आणि प्रियकराच्या नात्यामध्ये अडचण होणाऱ्या दोन लहान मुलांना मृत्यूच्या दारी नेलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली असून महिलेने आधी आपल्या दोन्ही मुलांचा जीव घेतला. त्यानंतर तिने स्वत: आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. महिलेने संध्याकाळच्या सुमारास दोन निरागस मुलांसह नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. पती-पत्नीमध्ये ‘तो’ आल्याने ही घटना घडल्याची माहिती आहे.

Jalgaon Crime: तरुणीने भर रस्त्यात तरुणावर सपासप फिरवला चाकू, घटनेचा VIDEO व्हायरल
झिमो देवी असं महिलेचं नाव असून तिने ८ वर्षांचा मुलगा संतोष आणि अडीच वर्षांची मुलगी भावना यांच्यासह नाल्यात उडी घेऊन आत्महत्या केली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे झिमो देवी हिने आत्महत्या करण्याआधी दागिने आणि रोख रक्कम चक्क पेटवून दिली आणि नंतर सुसाईड नोट लिहून त्याचं स्टेटस ठेवलं. या सगळ्यांनंतर तिने आपल्या दोन निष्पाप मुलांसह नाल्यात उडी घेत आयुष्य संपवलं.

Weather Alert : मोचा चक्रीवादळामुळे राज्याला अतिवृष्टीचा इशारा, पुढचे ४ दिवस ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट
मृतकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, झिमो देवी हीचा सतत छळ होत होता. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. तिने सुसाईड नोटमध्येही याची माहिती दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ३ मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

भयंकर! छोट्याशा स्पीड ब्रेकरवरून सायकल उडवली, थोडक्यात वाचला चिमुरडा; CCTV व्हिडिओ पाहून हादराल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here