आसाम : आसामच्या गुवाहाटी इथं एका प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्याने असं काही केलं की वाचून तुमच्या अंगावर काटा येईल. डॉक्टर वलीउल इस्लाम आणि डॉक्टर संगीता दत्ता यांनी अल्पवयीन मुलीचं शोषण केलं. इतकंच नाही तर तपासादरम्यान, असे धक्कादायक खुलासे समोर आले की सगळेच यामुळे हादरले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर दाम्पत्याने अल्पवयीन मुलीला राहत्या घरातच चौथ्या मजल्यावर कैद करून ठेवलं होतं. या अवघ्या ३ वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्ट आणि शरीराच्या अनेक भागांवर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्या प्रायव्हेट पार्टला सिगारेटने जाळ्याचं समोर आलं आहे.

१० वर्षांचा संसार, पदरात २ मुलं; मध्यरात्री पत्नीचा गळा आवळा; क्रूर पतीने सकाळ होताच केलं भयंकर कृत्य

डॉक्टर दाम्पत्याची मोलकरीणही अटकेत…

या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली असून त्यांच्या मोलकरणीलाही अटक करण्यात आली आहे. यानंतर या क्रूर दाम्पत्याला ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर मोलकरणीला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या जोडप्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र हादरला! १४ वर्षीय मुलगी कुख्यात गुंडासोबत फसली, फुस लावून ३ शहरांमध्ये फिरवलं अन्…

डॉक्टर दाम्पत्य खोटं बोललं…

अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याच्या घरात एकूण ३ मुलं आहेत. ते जुळ्या मुलांचे जैविक पालक असल्याचं त्यांनी खोटं सांगितलं होतं. ही मुले कोणाची आहे, ती जोडप्याच्या घरी कशी आली? याचा तपास सध्या पोलीस करत असून यामध्ये काहीतरी भयंकर समोर येईल, असा अंदाज आहे.

दरम्यान, या डॉक्टर दाम्पत्याने फक्त अल्पवयीन मुलीचेच नाहीतर मुलाचेही शारीरिक शोषण केलं आहे. पीडित मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी दोघांचीही चौकशी केली असता पीडित चिमुरडीवर गेल्या अनेक महिन्यांपासून अत्याचार सुरू आहेत. शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून या दाम्पत्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. यानंतर जे समोर आलं त्याने संपूर्ण पोलीस पथक हादरून गेलं.

नवऱ्याकडून रोज व्हायचा अमानुष छळ; सफाई करताना पत्नीला सापडला असा कागद ज्याने गेमच पलटला
घरात असलेल्या मुलांची अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला. ज्यावेळी पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी पती-पत्नी घरी नव्हते. मोलकरणीची चौकशी करताच तिने सगळं सत्य पोलिसांना सांगितलं. यानंतर दोन्ही दाम्पत्याचा शोध घेण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे.

Crime News: आईसह मुलाचं अपहरण, खून अन् २८ दिवस बंद खोली; मुंबईतल्या हत्याकांडाची स्टार्ट टू एण्ड कहाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here