छत्रपती संभाजीनगर: शेजारच्या व्यक्तीने आपल्या सुनेला कोणासोबत तरी पळवल्याच्या संशयातून एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नाही तर वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या पत्नीला देखील मारहाण करून तिचेही डोके फोडले आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती व्यंकट आईतवाड (वय-४०) राहणार वडगाव कोल्हाटी वाळूज परिसर असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मारुती हे गेल्या काही वर्षांपासून वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी या ठिकाणी कुटुंबीयांसोबत राहतात. मारुती यांच्या शेजारी देविदास ताठे नामदेव ताठे यांचे कुटुंबीय राहते. या दोन्ही कुटुंबातील पूर्वीपासून संबंध चांगले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी ताठे कुटुंबातील सून घरात कुणालाच काही न सांगता निघून गेली. दरम्यान, या प्रकरणी नातेवाईकांनी शोध घेतला मात्र अद्याप शोध लागला नाही.

तरुण दिसण्यासाठी २०० शस्त्रक्रिया, आता मुलाला लोक बॉयफ्रेंड समजतात; खरं वय जाणून थक्क व्हाल
दरम्यान, आपल्या सुनेला शेजारी राहणाऱ्या मारुती ऐतवाड यांनी इतर व्यक्तीसोबत पळून नेल्याचा संशय ताठे कुटुंबीयांना होता. यामुळे मारुती यांच्या बद्दल ताठे कुटुंबीयांच्या मनात राग होता. दरम्यान शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मारुती आईतवाड हे रस्त्याने जात असताना त्यांना शेजारी राहणारे देविदास ताठे राधाबाई ताठे आणि नामदेव ताठे यांनी अडवले. यावेळी तू आमच्या सुनेला फुस लावत कोणासोबत तरी पळून लावले आहे असा आरोप केला. दरम्यान यावेळी मारुती यांनी मी असं काहीच केलं नाही असं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ताठे कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

ताठे कुटुंबीयांनी मारुती याला बेदम मारहाण केली. घटना घराजवळ घडल्यामुळे पतीचा अरड ओरड करण्याचा आवाज ऐकून मारुती यांची पत्नी धाव घेतली. वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असताना मारुती यांच्या पत्नीला देखील ताठे कुटुंबीयांनी मारहाण केली यामध्ये मारुती यांच्या पत्नी रंजना यांच डोकं फुटलं.

दरम्यान, या प्रकरणी मारुती व्यंकट आईतवाड यांनी तात्काळ पत्नीसह वाळुज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला याप्रकरणी मारुती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताठे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

MIG-21 Crashed: राजस्थानमध्ये घरावर मिग-२१ विमान कोसळलं, गच्चीवर झोपलेल्या महिलेसह दोघांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here