नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वणी येथे एका व्यापाऱ्याच्या दुकानात साप शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तातडीने सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. परंतु हा साप पकडल्यानंतर हा साप विशेष श्रेणीतला असून अल्बिनो जातीच्या “धूळ नागीण” प्रकारातील असल्याचे सर्पमित्र भगवान पवार यांनी सांगितले.

वणी येथील एका दुकानाच्या पुढे असलेल्या भागातील फरशीच्या पोकळीत हा साप शिरला होता. तो पकडल्यानंतर हा नाग विशेष श्रेणीतला असून, अल्बिनो जातीच्या धूळ नागीण प्रकारातील असल्याचे सर्पमित्र पवार यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात क्वचित आढळणारा “धूळ नागीण” जातीचा बिनविषारी सर्प अतिशय चपळ आहे. इंग्रजीमध्ये त्याला “रेसर” म्हटले जाते. बोली भाषेत चितळ्या पट्टेरी नागिन आणि चित्रांग मायकल या नावाने ओळखले जाते. या सर्पाची लांबी एक ते दीड मीटरपर्यंत असते. रंग फिकट किंवा गडद तपकिरी असतो. हा नाग बिनविषारी आहे, परंतू असा साप लाखात एक असा सापडतो. रंग भुरकट, डोळ्यांचा रंग गडद लाल, जिभेचा रंगही लाल असतो.
हायस्कूलमध्ये प्राध्यापक, १९९२ च्या दंगलीनंतर आयुष्य बदललं; शिक्षकी पेशातील विश्वनाथ महाडेश्वर महापौर कसे झाले?
अशा दुर्मिळ जातीचा साप जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळून आल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी अल्बिनो४ जातीची मण्यार लखमापूर येथे आढळून आली होती. ती ही पकडून जंगलात सोडण्यात आली होती. तसेच पकडण्यात आलेली “धूळ नागीण” प्रजातीची नागीण वणी येथील जंगलात सोडण्यात आली आहे. साप आढळून आला की तो कोणत्या प्रकारातला साप आहे, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता आढळून येते आहे. अनेक सापांच्या दुर्मीळ जाती वणी परिसरात आढळून येत असल्याचे पवार यांनी सांगितले.

वणी येथील व्यापाऱ्याच्या दुकानात बाहेर असलेल्या पायरींच्या पोकळीत हा साप शिरल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रचंड भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. परंतू सर्पमित्राला पाचारण केल्यानंतर व्यवस्थितरित्या या सापाचे रेस्क्यू करण्यात आले असून, त्याला एका जंगलात सोडण्यात आलं आहे.

Sharad Pawar : शरद पवारांचा चव्हाणांवर बोचरा वार, फडणवीसांना एकाच वाक्यात उत्तर अन् राऊतांबद्दल म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here