धुळे : राज्यात अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असताना धुळ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने उध्वस्त केला असून या प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील मोराणे शिवारात बनावट दारू तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार श्री संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहाच्या समोर असणाऱ्या एका बंद घरावर पोलिसांनी छापा टाकला असतात सुमारे लाखो रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.Mumbai Crime: आई शेजाऱ्यांकडे गेली, भावासमोरच बहिणीला खोलीत खेचलं अन्…; २२ वर्षीय तरुणाचं क्रूर कृत्य
धुळे तालुक्यातील एका बंद घरांमध्ये बनावट आणि विषारी दारू तयार करण्याचा प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तालुका पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकून ६० हजार ४८० रुपये किमतीच्या १८० मिली क्षमतेच्या ३३६ दारूच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच या बाटल्यांमध्ये बनावट मद्य भरून त्यावर बनावट स्टिकर आणि झाकण लावण्यात आल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाली आहे. त्याचप्रमाणे ४ हजार ३२० रुपये किमतीचा आणखी रॉयल चॅलेंज कंपनीचे बनावट मद्य देखील तयार केल्याचे निदर्शनास आले.

तालुका पोलिसांनी घटनास्थळावरून जी जी १६, ए एन १४०९ क्रमांकाची एक स्कुटी देखील जप्त केली असून या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मलिंदरसिंग गुरुमुखसिंग शिकलकर, रमेश गोविंदा गायकवाड, बिल्लू भिवराज साळवे अशा ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या या सर्व संशयित आरोपींविरोधात अजून कुठे काही गुन्हे दाखल आहे का? अजून कुठल्या ठिकाणी बनावट दारूचा कारखाना चालवतात याचा कसून शोध धुळे तालुका पोलीस करीत आहेत.

मुलांना खोलीत डांबलं, रोज सिगारेटने प्रायव्हेट पार्ट जाळले अन्…; प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्याच्या क्रूरतेने खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here