१२ अंकी आधार कोणत्याही नागरिकाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच जारी केले जातो, पण अनेक वेळा आपण फक्त आधार बघून आपण ते बरोबर आहे असे गृहीत धरतो, आणि १२ अंकी क्रमांकाचे व्हेरिफिकेशन करत नाही. आधार जारी करणारे प्राधिकरण (UIDAI) म्हणते की प्रत्येक १२ अंकी क्रमांक आधार नसतो.
एक चूक ठरेल महागात
तुमची फसवणूक होऊ नये यासाठी बनावट आधारची पडताळणी करण्यासाठी १२ अंकी क्रमांक तपासणे आवश्यक आहे. समजा तुम्ही तुमचे दुकान किंवा घर एखाद्याला भाड्याने दिले आहे. तर त्याची ओळख प्रस्थापित करण्यासाठी तो तुम्हाला आधारची एक प्रत देतो.
एखाद्या व्यक्तीकडे आधार आहे म्हणजे त्याची ओळख बरोबर आहे असे तुम्ही गृहीत धरता. पण हीच तुमची मोठी चुक ठरू शकते. कारण आज कुणीही बनावट आधार कार्ड बनवू शकते. आणि म्हणजे जेव्हा तुम्ही आधारची पडताळणी करता तेव्हा योग-अयोग्य समोर येईल. कारण बनावट आधार क्रमांकाचा तपशील UIDAI वेबसाइटवर मिळणार नाही.
आधार कार्डाची ऑनलाईन पडताळणी
आधार पडताळणी सहज ऑनलाइन करता येते. UIDAI पडताळणी सेवा पुरवते तर यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही आणि प्रक्रियाही सोपी आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करा.
ऑनलाइन पडताळणी पद्धत
mAadhaar ॲपद्वारे तुम्ही कोणतेही आधार सत्यापित करू शकता. सर्व आधारमध्ये क्विक रिस्पॉन्स (QR) कोड असतो. तुम्ही आधार स्कॅन करून त्याची पडताळणी करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला प्रथम mAadhaar डाउनलोड करावे लागेल. आणि यामध्ये तुम्हाला आधार पडताळणीसाठी दोन पर्याय मिळतील.
पहिल्या पर्यायात तुम्हाला तुम्ही आधार क्रमांकासह पडताळणी करू शकता तर दुसऱ्या पर्यायात तुम्ही आधार कार्डवर दिलेला QR कोड ‘QR कोड स्कॅनर’ने स्कॅन करून आधार सत्यापित करू शकता. याशिवाय, आधार QR स्कॅनर ॲपद्वारे QR कोड स्कॅन करून देखील आधारची पडताळणी केली जाऊ शकते.