पहा हा थरारक व्हिडिओ –
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विमान आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याचं दिसत आहे. फ्लाइटचा मागील भाग आगीच्या ज्वाळांनी वेढलेला आहे. आगीच्या धुराचे लोट आकाशात उंचापर्यंत पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी फ्लाइटच्या पुढील बाजूचे आपत्कालीन गेट उघडण्यात आले. आपला जीव वाचवण्यासाठी प्रवासी त्या दारातून बाहेर पडून सैरावैरा पळतानाही स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे, याबाबत सध्या काही माहिती नाही. पण हा अपघात किती भीषण आहे, हे हा व्हिडिओ पाहून सहज लक्षात येते.
बुलढाण्यात अज्ञातांनी क्षणार्धात पेटवली सनरूफ कार, सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला थरार!
हा व्हिडिओ आतापर्यंत १.५० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अशा प्रकारे विमानाला लागलेली आग कदाचितच तुम्ही पाहिली असेल. यादरम्यान जीव वाचवण्यासाठी प्रवासी कसे पळताहेत हे पण यात स्पष्ट दिसत आहे. फ्लाईटमध्ये लागलेल्या आगीने काही सेकंदातच सर्वांना वेठीस धरले आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे विमानाला आग लागली असावी, असा संशय आहे.