ब्राझिल : गरोदरपणातील ९ महिने वेदना आणि कळा सोसल्यानंतर अपेक्षा असते ती आपलं बाळ सुरक्षित जन्माला यावं याची. पण विदेशात एका जोडप्यासह असा प्रकार घडला की वाचून तुमच्या काळजाचं पाणी होईल. ब्राझीलमधलं एक जोडपं आपल्या येणाऱ्या बाळासाठी खूप उत्साही होतं. पण डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे क्षणात असं काही घडलं की आता ते बाळ या जगातच नाही आहे.या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून या दाम्पत्याने संबंधित रुग्णालयाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्याच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी बाळाच्या जन्मावेळी त्याची मान तोडली. या जोडप्याने असा आरोप केला आहे की, प्रसूती सुरू असताना डॉक्टरांनी आईच्या पोटावर इतका भर दिला की यामध्ये बाळाची मानच तुटली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा महिलेची डिलीव्हरी होत होती, त्यावेळी पती तिथेच उभं राहून पाहत होता.

Mumbai Crime: आई शेजाऱ्यांकडे गेली, भावासमोरच बहिणीला खोलीत खेचलं अन्…; २२ वर्षीय तरुणाचं क्रूर कृत्य
महिलेनेही दिलेल्या माहितीनुसार, तिने तिचे मूल गर्भात फिरताना पाहिले आहेत. ते जिवंत होते. पण डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा जीव गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Maharashtra Crime: अख्खं शहर होतं धोक्यात! पोलिसांचा अचानक बंद घरावर छापा; दारूच्या बाटल्यांचा खच पण…

वडिलांनी जन्माला येण्याआधीच लेकराचा डोळ्यांदेखत पाहिला मृत्यू….

ही घटना १ मे रोजी घडली आहे. पीडित जोडप्याने या घटनेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, गरोदर असताना अडचणी येत असल्याने डॉक्टरांनी त्यांना लवकर प्रसूती करण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यावर जोडप्यानेही होकार दिला. यानंतर डॉक्टरांनी वडिलांना ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावलं. सर्व काही ठीक होतं. वडिलांनी आपल्या बाळाला आईच्या गर्भात फिरतानाही पाहिलं. पण ते बाळाला आपल्या मांडीवर घेऊच शकले नाहीत.

गळा मोडल्याची भयंकर घटना….

पीडित वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, डॉक्टरांनी ऑपरेशन करताना बाळाची मान मोडली. पण रुग्णालयाने याला स्पष्ट नकार दिला आहे. डॉक्टर अशा पद्धतीचा निष्काळजीपणा करूच शकत नाही असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. तर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

Weather Alert : मोचा चक्रीवादळामुळे राज्याला अतिवृष्टीचा इशारा, पुढचे ४ दिवस ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here