मुंबई: कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी १० दिवसांच्या होम क्वारंटाइनची अट असल्याने उशीर न करता हजारो चाकरमानी वेळेत एसटी बसने वा खासगी वाहनाने आपल्या गावी दाखल झाले आहेत. आता उद्यापासून मुंबई-ठाण्यातून गावी जाण्यासाठी निघणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिकच खडतर असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. ( )

वाचा:

हा कोकणातील सर्वात मोठा सण असून विशेषत: आणि जिल्ह्यात घरोघरी बाप्पांचे आगमन होते. या सणाला दरवर्षी मुंबई, ठाणे, पालघर भागात नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी येतात. यंदा मात्र करोना साथीमुळे या चाकरमान्यांच्या वाटेत अनेक विघ्ने उभी ठाकली. यात राज्य सरकारने एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देत काहीसा दिलासा दिला असला तरी चाकरमान्यांचा मनस्ताप कमी झालेला नाही.

वाचा:

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याला अनुसरून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनीही नियमावली तयार केली आहे. ही नियमावली लक्षात घेता उद्यापासून मुंबईतून कोकणात येण्यासाठी निघणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याला ४८ तास आधी करोना चाचणी करून घेण्याचे बंधन असणार आहे. त्यासोबतच जिल्ह्यात पोहचल्यानंतर ३ दिवस राहावं लागणार आहे. त्यामुळे कोकणच्या वाटेतील अडथळ्यांची मालिका सुरूच असून या स्थितीतही चाकरमान्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. विशेषत: नोकरदार वर्गासाठी इतकी मोठी सुट्टी मिळणे अशक्य असल्याने करोना चाचणीची अट पूर्ण करून गाव गाठण्याची मनाची तयारी अनेकांनी केली आहे. अशा चाकमान्यांचा ओघ उद्यापासून पाहायला मिळणार आहे.

वाचा:

उद्यापासून ‘हे’ आहेत नियम…

> १३ ऑगस्ट व नंतर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना ४८ तास अगोदर कोविड-१९ ची चाचणी ( ) करून घ्यावी लागणार आहे. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असला तरच कोकणात जाता येणार आहे. जिल्ह्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तीला तीन दिवस होम क्वारंटाइन रहावे लागेल. तसे जिल्हा प्रशासनाने आधीच जाहीर केले आहे.

> एसटी बसने कोकणात येण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. मात्र, इतर खासगी गाड्यांनी येणाऱ्यांना ई-पास बंधनकारक आहे.

> मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांवरून १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान एसटी बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here