कोल्हापूर: अभिनेते, आमदार, खासदार, गायक, कवी हे कसले सेलिब्रिटी? त्यांच्याऐवजी दोनशे-तीनशे वर्षे देणाऱ्या झाडांना करा, त्यांचा शोध घेऊन त्यांना टॉप टेनचा दर्जा द्या, असे आवाहन अभिनेते आणि सह्याद्री वनराई वृक्षचळवळीचे प्रणेते यांनी केले. ( on Environment )

जगातील दोनशे देशातील कोटीहून अधिक लोकांना ‘’ या चळवळीत सहभागी करून घेतलेल्या हिच्या गाजलेल्या भाषणांच्या मराठीतील पहिल्या व्हिडीओचा लोकार्पण समारंभ अभिनेते शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, मेहता प्रकाशनच्या ‘ग्रेटाची गोष्ट’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. फ्रायडेज फॉर फ्युचरच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.

वाचा:

अभिनेते शिंदे यावेळी बोलताना म्हणाले, ‘आपल्याला वर्षानुवर्षे ऑक्सिजन देणारी झाडे हीच खरी श्रीमंती आहे. आई नंतर त्यांनाच खरे महत्त्व आहे. त्यामुळे त्या त्या भागातील, गावातील जुन्या झाडांचा शोध घ्या, त्यांना सेलिब्रिटी करा. त्यांना पाहण्यासाठी सहली काढा. पर्यावरण वाचवा हा विचार कपाटात बंद आहे, तो बाहेर काढा, प्रत्येकांनी पाच झाडे लावा, त्यांचे वाढदिवस साजरे करा. प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये वृक्ष बँक करा, अभ्यासक्रमात पर्यावरण या विषयाची सक्ती करा. हे सारे केले तरच पर्यावरणाचा ऱ्हास थांबणार आहे.’

पर्यावरण वाचवण्यासाठी ग्रेटा थनबर्ग नावाच्या नववीत शिकणाऱ्या स्वीडन देशातील मुलीने शाळा बंद आंदोलन पुकारले. जे बोलू शकत नाहीत, अशा झाडे, वेली, पशू, पक्षी, नद्या, डोंगर यांचा ती आवाज बनली. जगातील सर्व पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष व उद्योगपतींच्या समोर ती निर्भीडपणे बोलत राहिली अन मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन उभे राहिले. त्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याची गरज आहे, असे आवाहनही सयाजी शिंदे यांनी केले.

वाचा:

नितीन डोईफोडे यांनी प्रास्ताविक केले. सिद्धार्थ सयाजी शिंदे याने ग्लोबल वॉर्मिंगचे संकट चिंताजनक असून पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी प्रा. सुहास वायंगणकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कुत्री, मांजरंही आत्महत्या करत नाहीत!

काळ निश्चितच कठीण आहे, पण या काळात देखील कुत्री, मांजरं आत्महत्या करत नाहीत. आत्महत्या करू नये हे त्यांनाही कळते. मग आपण कशासाठी आत्महत्या करत आहे, असा सवाल करून सयाजी शिंदे म्हणाले, ‘कठीण प्रसंगीच आपण खंबीर व्हायला शिकले पाहिजे.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here